Next
आता रेशन दुकानात मिळणार बँकिंग सुविधा
येस बँकेच्या सहायाने शासनाचा अभिनव उपक्रम
BOI
Wednesday, January 23, 2019 | 06:20 PM
15 0 0
Share this story


मुंबई : आता रेशनिंगच्या दुकानांत फक्त धान्य मिळणार नाही, तर चक्क बँकिंग सुविधेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मंगळवार, २२ जानेवारी २०१९ पासून रेशनिंगच्या ग्राहकांना ही अभिनव सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने येस बँकेच्या सहायाने हा अभिनव उपक्रम राबविला असून, येस बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून रेशन दुकानदारांना काम करता येणार आहे. 

पालघर, ठाणे, पुणे, लातूर, कोल्हापूर आदी १२ जिल्ह्यांमधील २० हजारपेक्षा अधिक दुकानांमधून ही सेवा उपलब्ध होईल. यामुळे जवळपास सात लाख लोकांना फायदा होईल. 

रेशन दुकानात असलेल्या पॉस मशिनच्या माध्यमातून आधार निगडीत पेमेंट सिस्टीमच्या मदतीने बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, पैसे काढणे,पैसे भरणे यासह बिले भरणा, डीटीएच रिचार्ज, मोबाइल रिचार्ज आदी मूल्यवर्धित बँकिंग सेवा रेशनिंग ग्राहकांना मिळणार आहेत. 

याबाबत गिरीश बापट म्हणाले, ‘ इ-पीडीएस सुविधेमुळे सरकारला दहा लाखांपेक्षा अधिक बोगस रेशनकार्ड या व्यवस्थेतून बाद करणे शक्य झाले आहे. आता या नवीन सुविधेमुळे स्वस्त धान्य दुकानदारांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळेल आणि ग्राहकांना सहजपणे बँकिंग सुविधा उपलब्ध होईल.’

येस बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी रितेश पै म्हणाले, ‘तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्यासाठी बँक कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेत कार्ड मिळून देखील जे त्याचा वापर करू शकत नाहीत,अशा लोकांना इ-पॉस मशिनच्या सहायाने बँक खात्यात व्यवहार करता येतील.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link