Next
‘वंचितांच्या विकासासाठी ‘सीएसआर’ वापरावा’
प्रेस रिलीज
Saturday, May 12 | 04:48 PM
15 0 0
Share this story



पुणे : ‘समाजातील वंचित घटकांची संख्या मोठी आहे. देशाच्या ग्रामीण भागातील सर्व लोकांपर्यंत आरोग्य, शिक्षणाच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. त्यांचा विकास साधण्यासाठी आपण प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. ‘सीएसआर’चा उपयोग या वंचित घटकांच्या विकासासाठी व्हावा. त्यासाठी सिंधी बांधवानी पुढाकार घ्यावा,’ असे मत मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी व्यक्त केले.

सिंधी समाज पुणे संस्थेच्या वतीने स्वर्गीय प्रल्हाद पी. छाब्रिया यांच्या स्मरणार्थ सिंधी समाजातील ३० वर्षांखालील युवकांना रितू छाब्रिया यांच्या हस्ते ‘शायनिंग स्टार्स अॅवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सिंधी समाज पुणेचे अध्यक्ष अॅड. हरेश हेमराजानी, पदाधिकारी राजेश शाहजवाला, राजू लुल्ला, प्रकाश बलाणी, जयहिंद हायस्कूलच्या प्राचार्य ज्योतिका मालकानी यांच्यासह इतर मान्यवर व सिंधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. जयकुमार मुलचंदानी, मायक्रोसॉफ्टसाठी निवडलेला करण परसेजा, अॅटलास कोप्कोमधील प्रकल्प अभियंता दीपिका रघानी, दंतचिकित्सक डॉ. नेहा मुलानी, लेखापाल पूजा अडवाणी, सिस्का एलईडीच्या गीतिका उत्तमचंदानी, क्रिषा कृष्णानी, फेसबुक पुला ग्रुपच्या सोनिया अग्रवाल, ‘सिंधजी पुकार’चे संपादक विनोद रोहानी यांना सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार सोहळ्यानंतर दादा वासवानी यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त सेंट मिराज हायस्कूलच्या विद्यार्थिनी सिंधी संस्कृतीचे दर्शन घडवीत नृत्य आणि नाटिकांमधून सादरीकरण केले. राजेश शाहजवाला यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link