Next
‘कोटक’ची तत्काळ चालू खाते उघडण्याची सुविधा
BOI
Tuesday, July 17 | 11:37 AM
15 0 0
Share this story

मुंबई : कोटक महिंद्रा बँकेने (कोटक) स्वतंत्र व्यक्तींसाठी बायोमेट्रीकच्या माध्यमातून आणि सोल प्रोप्रायटरशिप अकाऊंट्ससाठी स्कॅनिंगच्या माध्यमातून तत्काळ चालू खाते उघडण्याची सुविधा सुरू केल्याची घोषणा केली. आधारशी निगडीत बायोमेट्रिक खाते उघडण्याच्या सुविधेमुळे स्वयंरोजगार व गैर-व्यावसायिकांना तत्काळ चालू खाते उघडण्याची व कार्यान्वित करण्याची सुविधा मिळणार आहे.

सोल प्रोप्रायटरशिप व्यवसाय स्कॅनिंगच्या प्रक्रियेद्वारे ‘कोटक’मध्ये चालू खाते उघडू शकतात. यामुळे पूर्वी चालू खाते उघडण्यासाठी सहा ते सात दिवस लागणारा वेळ कमी होऊन केवळ एक दिवसावर आला आहे.

कोटक महिंद्रा बँकेचे सीनिअर एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट पुनीत कपूर म्हणाले, ‘ग्राहकांसाठी बँकिंग जलद, सोपे आणि अधिक सुलभ करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. डाउनलोड करण्याजोगे देशातील पहिले डिजिटल बँक खात्याची सुविधा ८११ द्वारे आम्ही मार्च २०१७मध्ये सुरू केली. बायोमेट्रिक आणि स्कॅनिंगच्या प्रक्रियेद्वारे कुठल्याही त्रासाशिवाय व तत्काळ चालू बँक खाते उघडण्याचा अनुभव स्वतंत्र व्यक्ती आणि सोल प्रोप्रायटरशिप कंपन्यांना मिळेल. स्वयंरोजगार करणारे आणि सोल प्रोप्रायटरशिपचे मालक आता त्यांच्या व्यवसायासाठी तयार केलेल्या विविध बँकिंग सुविधांचा लाभ सोप्या पद्धतीने घेऊ शकतील.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link