Next
राजुरी येथे कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, March 04, 2019 | 05:19 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोपुणे : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन नाशिक रोड-राजुरी येथील पराशर कृषी पर्यटन केंद्रात करण्यात आले आहे. ही कार्यशाळा नऊ आणि १० मार्च २०१९ रोजी होईल.

शेतीला पुरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटन वृद्धीसाठी कृषी पर्यटन विश्व प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय कार्यशाळेत कृषी पर्यटन संकल्पना, केंद्र उभारणी, व्यवस्थापन भविष्य आणि डिजिटल मार्केटिंग, जाहिराती, सोशल मीडिया या महत्त्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी सशुल्क नोंदणी मार्चच्या आधी करणे आवश्यक आहे.

या कार्यशाळेत ‘एमटीडीसी’ पुणे विभागाचे विभागीय अधिकारी दीपक हरणे, आयडीबीआय बॅंकेचे शाखा व्यवस्थापक सचिन म्हस्के, आमंत्रण कृषी पर्यटनाचे संचालक शशिकांत जाधव, पराशर कृषी पर्यटनचे मनोज हाडवळे, पुण्यातील कृषी पर्यटन विश्वचे संचालक गणेश चप्पलवार हे मार्गदर्शन करणार आहेत.

‘इच्छुक शेतकरी व इतर व्यावसायिकांना कृषी पर्यटन संकल्पना समजावी, कृषी पर्यटनाची संकल्पना, तसेच कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी लागणारी माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे. नव्याने कृषी पर्यटन केंद्र सुरू करणाऱ्या लोकांना या कार्यशाळेचे उपयोग नक्कीच होईल,’ असा विश्वास कृषी पर्यटन विश्वचे संचालक चप्पलवार यांनी व्यक्त केला.
 
कार्यशाळेविषयी :
दिवस :
नऊ आणि १० मार्च २०१९
स्थळ : पराशर कृषी पर्यटन केंद्र, राजूरी, आळेफाटा, नाशिक रोड, पुणे
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क : ८८८८५ ५९८८६.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 150 Days ago
Such works should be organised in Marathawada as In vidarbh.
0
0
Balkrishna gramopadhye About 171 Days ago
More ofThese ,Please. Best wiShes.
0
0

Select Language
Share Link
 
Search