Next
अवान मोटर्सद्वारे इलेक्ट्रिक स्कूटर ‘ट्रेंड ई’चे अनावरण
प्रेस रिलीज
Tuesday, March 12, 2019 | 01:38 PM
15 0 0
Share this story

मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अवान मोटर्स इंडियाने आपली नवीन स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर ‘ट्रेंड ई’चे बेंगळूरू येथील ‘ऑटोमोबाइल एक्स्पो २०१९’मध्ये अनावरण केले.

इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या आपल्या झेरो सिरीजमधील ही उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारी नवी स्कूटर ‘ट्रेंड ई’ एका लिथियम आयन बॅटरीद्वारा संचलित असून ताशी ४५ किमीपर्यंत वेगाचा दावा करते. शिवाय ही इलेक्ट्रिक स्कूटर एक बॅटरीत तब्बल ६० किमी आणि डबल बॅटरीत ११० किमी चालते. लिथियम-आयन बॅटरीच्या चार्जिंगसाठी दोन ते चार तासांचा कालावधी लागतो.

‘अवान’चा अत्याधुनिक टेक्नॉलॉजी प्रतिभेवर आणि शक्तीवर असलेला भर ‘ट्रेंड ई’मध्येदेखील दिसून येतो. या गाडीत हायड्रॉलिक टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि कॉइल स्प्रिंग रियर सस्पेन्शन आहे. शिवाय या स्कूटरमध्ये अलॉय व्हील्स असून, पुढील आणि मागील चाकांवर अनुक्रमे डिस्क आणि ड्रम ब्रेक बसवलेले आहेत. ही स्कूटर १५० किलोपर्यंत वजन घेऊ शकते.

‘अवान’चे व्यवसाय विकास प्रमुख पंकज तिवारी म्हणाले, ‘झेरो मालिकेतील नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘ट्रेंड ई’मध्ये तंत्रज्ञान आणि आधुनिक चालकांच्या आवश्यकता पूर्ण करणाऱ्या डिझाइनचा योग्य संगम साधलेला आहे. ‘ट्रेंड ई’ स्कूटरमध्ये प्रत्येक फीचर चालकाच्या आवश्यकता आणि पसंतीच्या आधारे विचारपूर्वक ठेवलेले आहे, जेणेकरून वाहनावरून प्रवास करण्याचा एक उत्कृष्ट अनुभव चालकाला मिळू शकेल. हाय ग्राउंड क्लियरन्ससह, लिथियम आयन डिटॅचेबल बॅटरी पॅक आणि त्याच्या ट्रेंडी लुकमुळे या स्कूटरने क्लास फीचर्समध्ये सर्वश्रेष्ठ स्थान पटकावले आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link