Next
वरुण गांधींनी साधला ​​‘अजिंक्य’तील विद्यार्थ्यांशी संवाद
प्रेस रिलीज
Wednesday, April 18 | 10:45 AM
15 0 0
Share this story

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये ‘लर्न फ्रॉम द मास्टर्स’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी.पुणे : चर्होली येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये ‘लर्न फ्रॉम द मास्टर्स’ या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार वरुण गांधी यांचे व्याख्यान नुकतेच झाले. या वेळी विद्यापीठातील जवळपास ५५०हून अधिक विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

गांधी म्हणाले, ‘फक्त पैसा, मोठ्या गाड्या बाळगल्याने आपण आयुष्यात यशस्वी झालो, असे नसते. एखादे ताकदवान वादळ झाडाला नष्ट करू शकते, तसेच एखादे मोठे संकटही आपल्याकडील पैसा नष्ट करू शकते. अशावेळी आपल्याकडे काही शिल्लक राहात असेल, तर ते म्हणजे लोकांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद. तरूणांनी आपले ध्येयदृष्टीकोन एकत्र आणून राष्ट्र उभारणीत केवळ कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर सहयोगी म्हणून काम केले पाहिजे, जेणेकरून समाजात सकारात्मक बदल दिसून येईल.’

‘लर्न फ्रॉम द मास्टर्स’ या उपक्रमांतर्गत व्याख्यानासाठी उपस्थित खासदार वरुण गांधी यांचे स्वागत करताना विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील.खासदार गांधी यांनी व्याख्यानामध्ये देशातील विविध भागात निरनिराळ्या कल्पना घेऊन सामाजिक कामातून आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या युवक-युवतींची उदाहरणे दिली. ‘मी एकटा किंवा एकटी आहे, मी काय करणार, माझ्याकडे काही करण्यासाठी पैसे नाहीत, असा विचार न करता मी बदल कसा घडवू शकेन, याचा विचार युवक व युवतींनी करावा आणि सामाजिक उद्योजकतेच्या माध्यमातून बदल घडवावा,’ असे आवाहन त्यांनी केले.

‘इंग्लंडमध्ये याचिका प्रणालीच्या माध्यमातून संसदेत चर्चा घडवून आणता येते, तशीच सक्षमता भारतातही विद्यार्थ्यांतही यायला हवी; परंतु भारतीय युवकही माहितीचा अधिकार, सोशल मिडिया, नागरी पत्रकार अशा माध्यमांतूनही आपला आवाज बुलंद करू शकतात. समाजाच्या देण्याची परतफेड करावी, हा उत्तम धडा आपण शिकू शकतो,’ असे गांधी यांनी नमूद केले.

गांधी यांच्या व्याख्यानानंतर त्यांचा विद्यार्थ्यांबरोबर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. बी. खेडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालक मंडळ सदस्य हृदयेश देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link