Next
ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा सत्कार
प्रेस रिलीज
Tuesday, January 22, 2019 | 02:20 PM
15 0 0
Share this story

सुचेता भिडे-चापेकर यांचा सत्कार करताना डावीकडून अजित भिडे, अरुण फिरोदिया आणि नंदकुमार काकिर्डे.

पुणे : ज्येष्ठ भरतनाट्य नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांच्या नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा सत्कार ज्येष्ठ उद्योजक आणि भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्र समितीचे उपाध्यक्ष अरुण फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला.

चापेकर यांनी नुकतेच सत्तरीत पदार्पण केले आहे. या वेळी भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे, अश्विनी एकबोटे, मुक्तांगण विज्ञान शोधिकेचे मानद संचालक अजित भिडे, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ विजयम कर्था आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना फिरोदिया म्हणाले, ‘सुचेता भिडे-चापेकर यांनी जीवनभर कलेची सेवा केली आहे. त्यांचे मार्गदर्शन नव्या पिढीला घडत राहो. भारतीय विद्या भवनला त्यांनी कलेचे मार्गदर्शन करावे.’

सत्काराला उत्तर देताना चापेकर म्हणाल्या, ‘नृत्याला संगीताची जोड असेल, तरच ते अजरामर होते. नवी पिढी जुन्या परंपरेचा वारसा घेऊन पुढे जात आहे, ही चांगली बाब आहे. माझे गुरू पार्वतीकुमार यांच्यामुळे महाराष्ट्रात शास्त्रीय नृत्य परंपरा सुरू झाली. ती पुढे नेली पाहिजे. या सत्काराबद्दल मी कृतज्ञ आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link