Next
राज्यात लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण
पालघर आणि भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक ३५ निकाल फेऱ्या
प्रेस रिलीज
Wednesday, May 22, 2019 | 03:23 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे २०१९ रोजी होणार असून, राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

राज्यातील ४८ लोकसभेच्या जागांसाठी २३ मे रोजी फेरी पद्धतीने निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणूक निरीक्षकांच्या देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार राज्यात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली आहे. मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. या अनुषंगानेही मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जनतेला मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहण्यास मिळणार आहे. तसेच टोलफ्री क्रमांकावर आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन केलेल्या व २४ तास कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षातही निवडणूक निकालाची अद्ययावत माहिती मिळणार आहे. मंत्रालयामध्ये माध्यम प्रतिनिधींना निवडणूक निकालाची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून, हा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण, मुख्य गेट, गार्डन गेट आणि मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या डिजिटल होर्डिंगवर निकालाची माहिती मिळणार आहे. या शिवाय मुंबई शहरात वाहतूक विभागाच्या डिजिटल साइन बोर्डवरही निकालाची माहिती दिली जाणार आहे. मुंबईकरांना निवडणूक निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत यंदा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी हे जनतेला निकालाची फेरीनिहाय माहिती देणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांपैकी पालघर आणि भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ३५ निवडणूक निकाल फेऱ्या होणार आहेत.

पालघर, भिवंडी-गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात ३३ निवडणूक निकाल फेऱ्या, तर बीड आणि शिरुर मतदारसंघात ३२ निवडणूक निकाल फेऱ्या होतील. सर्वांत कमी म्हणजे १७ निवडणूक निकाल फेऱ्या हातकणंगले मतदारसंघात होतील. अमरावती आणि सांगली मतदारसंघात १८ निवडणूक फेऱ्या होतील. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण ८६७ उमेदवार उभे आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यभरात ९७ हजार ६४० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

नियंत्रण कक्षाचा क्रमांक : (०२२) २२०४०४५१/५४ 
टोल फ्री क्रमांक : १९५०
जनतेला निकाल पाहण्यासाठी वेबसाइट : ceo.maharashtra.gov.in
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search