Next
‘पत्रकार दिन’ सोहळ्याचे आयोजन
BOI
Saturday, January 05, 2019 | 06:17 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘पत्रकार दिनाचे औचित्य साधून रविवारी, सहा जानेवारी २०१९ रोजी पुणे मिडिया वॉच आणि सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी पत्रकार दिन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे सोहळ्याचे चौदावे वर्ष आहे’,अशी माहिती पुणे मिडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर व सिध्दार्थ वाचनालयाचे ग्रंथपाल दिलीप भिकुले यांनी दिली.

‘नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार भवनमध्ये रविवारी, सहा जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता हा सोहळा होणार आहे. या वेळी ‘बदलत्या तंत्रज्ञानांचे माध्यमांसमोरील आव्हान’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्रविदया विभागाचे सहाय्यक प्राध्यापक संजय तांबट यांचे व्याख्यान होणार असून, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा गौरवही करण्यात येणार आहे’,असेही जांभूळकर यांनी सांगितले. 

‘पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यामध्ये ‘नामदेव ढसाळ पत्रकारिता पुरस्कार’ सुगावा प्रकाशनचे प्रकाशक व दै. बहुजन महराष्ट्र वृत्तपत्राचे संपादक विलास वाघ यांना, ‘बाळासाहेब ठाकरे प्रभावशाली व्यंगचित्रकार पुरस्कार’ पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना, ‘पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार’ दै. आज का आनंद व दै. संध्यानंदचे संस्थापक संपादक श्याम अग्रवाल यांना, तर ‘उत्कृष्ट जनसंपर्क पुरस्कार’ ‘अक्षरकला’ जनसंपर्क संस्थेचे संचालक प्रविण वाळिंबे यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार दै. इंडियन एक्सप्रेसचे छायाचित्रकार आरुल होरायझन, उत्कृष्ट इलेट्रॉनिक माध्यम पुरस्कार ‘माय मराठी वेब मिडिया’चे संपादक शरद लोणकर, उत्कृष्ट उपसंपादक पुरस्कार दै. पुण्यनगरीचे उपसंपादक अशोक बालगुडे, उत्कृष्ट गुन्हे वार्तांकन पुरस्कार दै. पुणे मिररच्या अर्चना मोरे, प्रदीप रणपिसे राजकीय पत्रकारिता पुरस्कार आज का आनंदचे पत्रकार शैलेश काळे, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दै. केसरीचे पत्रकार स्वप्नील पोरे, उत्कृष्ट क्रीडा पत्रकारिता पुरस्कार दै. सकाळ टाइम्सचे मुनीर सय्यद , उत्कृष्ट उपनगर वार्ताहर पुरस्कार दै. लोकमतचे उपनगर वार्ताहर प्रमोद गव्हाणे यांना देण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय पुरस्कार भवानी पेठमधील हिंद बाल समाज मंडळ ट्रस्ट संचालित ज्योती वाचनालयाला, उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार वानवडी येथील श्रीगणेश न्यूज पेपर एजन्सीचे संचालक अतुल भुजबळ यांना देण्यात येणार आहे’, असे जांभूळकर यांनी नमूद केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link