Next
सॉफ्टबॉल लीग शुक्रवारपासून रंगणार
स्पर्धेत १२ संघांचा समावेश
BOI
Monday, December 24, 2018 | 05:11 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘‘एएवायएस’ सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने  सॉफ्टबॉल  लीग स्पर्धेचे आयोजन २८ ते ३० डिसेंबर दरम्यान स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष असून, सॉफ्टबॉल खेळाच्या प्रचारासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील लढती सकाळी १० वाजल्यापासून सुरू होतील,’ अशी माहिती सॉफ्टबॉल अकादमीचे अध्यक्ष अजय राणे व सचिव राजेंद्र मिसाळ यांनी दिली.

‘स्पर्धेचे उद्घाटन आयकर विभागाचे सहआयुक्त अमित दुवा, सहाय्यक आयुक्त (क्रीडा) किशोरी शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, या वेळी अभिनेते प्रवीण तरडे, रमेश परदेशी, एसपी बिर्यानीजचे जवाहर चोरगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सॉफ्टबॉल खेळाला आंतरविद्यापीठ स्पर्धेत स्थान मिळवून देणारे प्रा. एल. टी. देशमुख आणि आयकर अधिकारी व ज्येष्ठ खेळाडू अजय परदेशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे’, अशी माहिती सचिव राजेंद्र मिसाळ यांनी दिली.

‘या स्पर्धेमध्ये १२ संघ खेळणार असून, मुंबई, नागपूर, सांगली, पुणे, चंडीगड, इंदोर, छत्तीसगड, बंगलोर, नाशिक येथील सुमारे १७५ खेळाडू सहभागी होणार आहेत. हे खेळाडू कुमार प्रॉपर्टीज, मोहर व्हेंचर्स, अॅमनोरा (सिटी ग्रुप), चॅम्पियन युपीएस, सार्थक कॉर्पोरेशन, एसके ग्रुप, रचना लाईफस्टाईल, मुकुल माधव फाउंडेशन, एसजी व्हेंचर्स, व्होटेक्सा बॅटरीज, साईशा इन्फोटेक, मुळशी पॅटर्न या संघांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या वर्षी स्पर्धेत गौरव चौधरी, सुमेध तळवलकर, दीपक कुमार हे आंतरराष्ट्रीय खेळाडू तर, योगेश जागडे, श्रीकांत मारटकर, शुभम काटकर हे राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत’, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link