Next
रोपोसो अॅप मराठीत
Press Release
Monday, December 11, 2017 | 11:51 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : रोपोसो – ‘टीव्ही बाय द पिपल’ हा भारतातील पहिलाच डिजिटल मंच असून, भारतातील सर्वात पसंतीचे सोशल मिडिया अॅप म्हणून नावारुपाला येण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहे. आधीपासून इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेले हे अॅप आता मराठीसह हिंदी, गुजराती, पंजाबी, बंगाली, तामिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे विशेषतः निमशहरी आणि ग्रामीण शहरांवर लक्ष केंद्रित होऊन देशातील अन्य उपभोक्त्यांसह ‘रोपोसो’ जोडले जाईल अशी आशा आहे.

वापरकर्ते मैत्रीपूर्ण स्वरुपात त्यांच्या कथा निर्माण करून त्या दाखवू शकतात, अशी वेगळी संकल्पना रोपोसोने राबविली आहे. या मंचावर वापरकर्त्यांद्वारे निर्माण करण्यात आलेल्या मराठी विषयक कन्टेन्टमध्ये सुमारे ३९ टक्के वाढ दिसून आली. ही वाढ पाहूनच या समाजातील लोकांना प्रोत्साहन देण्याकरिता रोपोसोने हे अॅप मराठीत आणायचे ठरवले. आठ प्रादेशिक भाषांमध्ये याची ओळख करून देत रोपोसोने 'भारतीयांसाठी भारतातच बनवलेले' अशी प्रतिमा निर्माण केली असे नाही; तर असा मंच आणून स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी देशाच्या अन्य भागातूनही वापरकर्त्यांना बळ दिले आहे. अधिक भाषांची ओळख करून देत, रोपोसोचे वापरकर्ते त्यांच्या प्रादेशिक भाषेतील घटक कोणताही अर्थ गमावण्याची जोखीम न पत्करता शेअर करू शकतील.

रोपोसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक मयांक भागडिया म्हणाले, “भारतीय भाषा या जगभरात त्यांचा वेगळा असा टोन, त्यातील ताल आणि परंपरागत विनोदबुद्धीसाठी ओळखल्या जातात. आम्हाला आमच्या प्रादेशिक भाषांचा सार्थ अभिमान आहे आणि त्यातील काही अभिव्यक्ती या अन्य कोणत्याही भाषांमध्ये व्यक्त करणे शक्य होणार नाही. भाषांतरानंतर, आमच्या अॅप फीचर्समुळे वापरकर्त्यांना त्यांच्या प्रदेशातील भाषा समजून घेणे सहज शक्य होईल. आम्हाला विश्वास आहे की, या घोषणेमुळे, जगभरातील कानाकोपऱ्यातून #Desi stories साठी आम्ही दालने उघडली आहेत. लोकांना आपल्या मातीतील विविध भाषेतील अद्वितीय अनुभव रोपोसो प्लॅटफॉर्ममुळे घेता येतील आणि देशातील आमची सर्वांगीण लोकप्रियता वाढेल.”

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search