Next
आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनतर्फे विविध स्पर्धा उत्साहात
मिलिंद जाधव
Wednesday, January 16, 2019 | 05:56 PM
15 0 0
Share this story



मुंबई : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना एक विचारमंच उपलब्ध व्हावा या हेतूने आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी प्रश्नमंजूषा, महिला, एलजीबीटी आणि इतर अर्थाने सक्षम, समाजासोबत सेल्फी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, डॉ. बी. आर. आंबेडकर लिखित ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ या पुस्तकावर आधारित परीक्षा, स्वरचित काव्य वाचन स्पर्धा, पोवाडा, क्रांतीगीत गायन स्पर्धा, नारायण मेघाजी लोखंडे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रा. प्रमोद सावंत, अॅड. बिपीन साळवी आणि अक्षदा शिंदे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. काव्यवाचन स्पर्धेसाठी लोकशाहीर चरण जाधव, कवी सुमित गुणवंत आणि कवी सागर काकडे, तर पोवाडा-क्रांतीगीत स्पर्धेसाठी सिनेपार्श्वगायक प्रवीण ढोणे, धनंजय साबळे आणि लोकशाहीर चरण जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.



या सर्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांची घोषणा बक्षीस वितरणाच्या दिवशी म्हणजेच १७ जानेवारी २०१९ रोजी दुपारी एक ते सायंकाळी चार या वेळेत केली जाणार असून, विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या स्पर्धांसाठी संघटनेचे अध्यक्ष सचिन मनवाडकर आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संयोजन केले.

बक्षीस वितरणाविषयी :
दिवस :
गुरुवार, १७ जानेवारी २०१९
वेळ : दुपारी एक ते सायंकाळी चार
स्थळ : गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय १७२, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग, दादर (पूर्व), मुंबई- ४०० ०१४.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link