Next
पुण्यात १३ जुलैला ‘नवा शुक्रतारा’
प्रेस रिलीज
Saturday, July 07, 2018 | 01:13 PM
15 0 0
Share this story

पुणे : संगीतातील अढळ शुक्रतारा अरुण दाते यांना सांगीतिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अरुण दाते कला अकादमी आणि मॅजेस्टिक लॅंडमार्क्स यांच्यातर्फे ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. १३ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या एमईएस सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

यात प्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे, गायक श्रीरंग भावे, गायिका प्रज्ञा देशपांडे यांचा सहभाग असून, सिने अभिनेत्री अनुश्री फडणीस या निवेदन करणार आहेत. याबरोबरच अरुण दाते यांचे सुपुत्र व कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची आहे ते अतुल दाते स्वत: आपल्या वडिलांच्या कारकीर्दीतील रसिकांनी सहसा न ऐकलेल्या आठवणींचा खजिना उपस्थितांसमोर उलगडून दाखवतील. दृकश्राव्य माध्यमातून (ऑडिओ व्हिज्युअल) स्वत: अरुण दाते यांचा असणारा सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

मंदार आपटे हे ‘राधा ही बावरी’ या मालिकेबरोबरच ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाचे संगीतकार आणि गायक आहेत. श्रीरंग भावे हे ‘बालगंधर्व’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांचे गायक आहेत. प्रज्ञा देशपांडे यांनी अरुण दाते यांबरोबर सर्वाधिक म्हणजे तब्बल ७०० कार्यक्रमांमध्ये गायन केले असून, अरुण दातेंबरोबर इतके कार्यक्रम करणाऱ्या त्या एकमेव गायिका आहेत. याबरोबरच कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या अनुश्री फडणीस या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘दशक्रिया’ चित्रपटातील अभिनेत्री आहेत.

अरुण दाते यांनी वयोमानापरत्वे ‘शुक्रतारा’ कार्यक्रम करणे थांबवले, तेव्हा त्यांनी त्यांचे सुपुत्र अतुल दाते आणि मंदार आपटे, श्रीरंग भावे यांना हा ‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रम करण्याची परवानगी दिली होती. हा कार्यक्रम विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाईल.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
शुक्रवार, १३ जुलै २०१८
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : एमईएस सभागृह, बालशिक्षण मंदिर प्रशाला, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link