Next
‘सजीवांच्या अभ्यासात जैवमाहितीशास्त्र महत्त्वपूर्ण’
प्रेस रिलीज
Monday, July 30, 2018 | 02:50 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘सजीवांमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती भरलेली आहे. स्थायी, द्रव स्वरूपात शरीराची रचना असून, त्यात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन आहे. विविध पेशी, बॅक्टेरिया आणि जैविक घटक शरीरामध्ये आहेत. सजीवांच्या या अभ्यासासाठी जैवमाहितीशास्त्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे,’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जैवमाहितीशास्त्र केंद्राच्या संचालिका डॉ. संगीता सावंत यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक कट्ट्यावर ‘जैवमाहितीशास्त्र : सजीवांच्या माहितीचा शोध आणि बोध’ या विषयावर त्या बोलत होत्या. सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्राच्या सभागृहात भरलेल्या या वैज्ञानिक कट्टयावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष विनय र. र., सहकार्यवाह संजय मालती कमलाकर, ‘एमकेसीएल’चे प्रमुख डॉ. विवेक सावंत, सरव्यवस्थापक उदय पांचपोर, विज्ञानशोधिकेचे संदीप नाटेकर आदी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाल्या, ‘डीएनएसारख्या तंत्रामुळे अनेक गुन्हे, माहिती उघडीस आणली जाते. त्याशिवाय बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट), फॉरेन्सिक चाचणी यामुळे किचकट गोष्टींचा उलगडा होतो. वांशिक माहिती घेण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. शरीराचे, स्वभावाचे गुणधर्म ओळखण्यासाठी, कठीण कोडी उलगडण्यासाठी, व्यक्तिसापेक्ष उपचारांसाठी जैवमाहितीशास्त्र क्रांतिकारी ठरत आहे.’

यासह एखाद्या औषधाचे विपरीत परिणाम कसे होतात, बॅक्टेरियाचे चांगले आणि वाईट गुणधर्म, फॉरेन्सिक तपासणी कशी शक्य होते, धानाच्या काही जाती दुष्काळाचा सामना करू शकतात, तर काही करू शकत नाहीत, असे का, अशा अनेक प्रश्नांवर या वेळी चर्चा झाली. त्यासाठी बहुशाखांच्या एकत्रीकरणाचा कसा उपयोग होतो, यावरही उहापोह झाला. विनय र. र. यांनी मनोगत व्यक्त केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
ओंकार कामतकर, सोलापूर About
chan
0
0

Select Language
Share Link
 
Search