Next
भारतीय हिवाळ्यात लुटणार हापूस आंब्यांची मज्जा
आयजी इंटरनॅशनलने केली साउथ आफ्रिकेतून आंब्यांची आयात
प्रेस रिलीज
Thursday, November 22, 2018 | 05:14 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आयजी इंटरनॅशनल या भारतातील सर्वांत मोठ्या ताज्या फळांच्या आयातदार कंपनीने दक्षिण आफ्रिकेतून तीन जातींच्या आंब्यांची आयात केली आहे. त्यामुळे हिवाळ्यातही हापूस आंबा खाण्याची मजा भारतीयांना लुटता येणार आहे.

भारत हा आंबे पिकवणारा जगातील सर्वात मोठा देश आहे. हापूसच्या अवीट चवीमुळे माधुर्याच्या बाबतीत ती सर्वात श्रेष्ठ समजली जाते; पण या उष्णकटिबंधीय फळाचे पीक त्यास अनुकूल हवामानाच्या शर्तीनुसार देशात फक्त उन्हाळ्यातच येते. दरम्यान आंब्याची मोसमी प्रकृती आणि वर्षाच्या या काळात (हिवाळ्यात) आंब्यांची अनुपस्थिती लक्षात घेऊन ही आयात करण्यात आली आहे.

या आयातीबद्दल बोलताना आयजी इंटरनॅशनलचे संचालक तरुण अरोरा म्हणाले, ‘हापूस ही आंब्याची सर्वाधिक लोकप्रिय जात आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही त्याला चांगली मागणी आहे. सर्व भारतीय या फळाचा आस्वाद घेण्यासाठी आसुसलेले असतात. सध्या दक्षिण आफ्रिकेत आंब्याचा मोसम बहरलेला असल्याने आम्ही आंब्याच्या काही जाती आपल्या देशात, हिवाळ्यात या फळाचा आस्वाद लोकांना घेता यावा यासाठी मागवणार आहोत. आंब्यांचा मोसम दक्षिण आफ्रिकेत फक्त तीन आठवडे असतो, त्यामुळे या जातींचे आंबे हवाई मार्गे भारतात मर्यादित संख्येत आणले जाणार आहेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search