Next
‘आयएनआयएफडी डेक्कन’तर्फे कार्यशाळेचे आयोजन
BOI
Friday, June 29, 2018 | 04:38 PM
15 0 0
Share this storyपुणे : आयएनआयएफडी डेक्कन यांच्यातर्फे इंडियन जिओमन्सी सायन्स या विषयावर अधिक शिक्षण देण्यासाठी सात दिवसीय वास्तु संस्कृती कार्यशाळेचे आयोजन केले होते. यात उद्योग तज्ज्ञ अक्षय कुमार नवलखा यांनी मार्गदर्शन केले.

इंडियन जिओमन्सी सायन्स जे वास्‍तुशास्‍त्र म्‍हणूनही परिचित आहे. स्‍थापत्‍यशास्‍त्राची ही सर्वात अधिप्रमाणित कला आहे. हा कलेचा उगम भारतात झाला असून, यात ज्‍योतिषशास्‍त्र, खगोलशास्‍त्र आणि कलेचा संगम झालेला आढळून येतो. हे इमारत बांधकाम आणि रचना यांचे प्राचीन गूढ विज्ञान आहे. भारतीय ऋषी आणि विद्वानांनी गेल्‍या आठ हजार वर्षांपासून कोणत्‍याही इमारतीचे किंवा वास्‍तूचे बांधकाम करताना या कलेतील मूलभूत नियमांचे पालन केले आहे. यामध्ये निसर्गाकडून मिळणार्‍या लाभांचा उपयोग होईल, अशा अनुकूल जागी बांधकाम करणे आणि शास्‍त्रीय कारणे तसेच गूढ शास्‍त्र यांचा समावेश होतो, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.  

चांगले आरोग्‍य, आराम आणि सुसंवाद यांच्या माध्यमातून आपली जीवनशैली सुधारू शकतो; तसेच परिपूर्णता निर्माण करून वास्‍तू माणसावर शरीरिकदृष्‍ट्‍या परिणाम करू शकतो.  जागा, खेळती हवा, रंग, रचना, वापरलेले साहित्‍य, घटक आणि दिशा या गोष्‍टींकडे लक्ष देऊन अनुकूलता मिळवता येऊ शकते. तणावाची पातळी कमी करून, आरोग्‍य सुधारून, तसेच व्यक्‍तीच्या अंतर्गत आणि बाह्य संबंधांमध्ये सुधारणा करून वास्तू मानसिकदृष्‍ट्‍या लाभ करते. माणसाची अध्यात्‍मिक प्रगती होते, असा उल्लेख आपल्‍या प्राचीन ग्रंथांमध्ये आहे. अन्य कोणत्‍याही माध्यमाद्वारे प्राप्त न होणारे आंतरिक समाधान प्रदान करणे हे वास्तूचे तत्त्व आहे.

योग्‍य पद्धतीने याची अंमलबजावणी केल्‍यास त्‍या वास्तूतील रहिवाशांना अथवा वापरकर्त्यांना सर्व सुखसोयी आणि जीवनातील आनंद आणि जगण्याचा उद्देश प्रदान करणारे हे वरदानच ठरू शकते. अनेक नैसर्गिक घटक मानवी जीवनावर परिणाम करीत असतात. वास्‍तू तेथील रहिवाशांचे नशीब बदलू शकत नसली, तरी केवळ राहत्‍या जागेतील रचनेत फेरबदल करून दुःखपूर्ण आयुष्‍य सुखपूर्ण होऊ शकते.

‘अंतर्गत सजावट आणि फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रातील पदवी आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांविषयी अधिक माहितीसाठी एफसी रोडवरील आयएनआयएफडी डेक्कनशी संपर्क साधावा,’ असे आवाहन करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link