Next
गगनगिरी आश्रमात दत्तजयंती उत्सवाला सुरुवात
BOI
Tuesday, December 18, 2018 | 05:39 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेसजवळच्या प. पू. स्वामी गगनगिरी महाराज आश्रमात १९ ते २२ डिसेंबर २०१८ या कालावधीत दत्तजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. या दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अभंग गायन स्पर्धेने उत्सवाला प्रारंभ होईल. प.पू. स्वामी गगनगिरी महाराज भक्त मंडळ आणि स्वराभिषेक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी चार वाजता ही स्पर्धा होईल. रत्नागिरी तालुका मर्यादित १२ ते २० वर्षे वयोगटातील मुलांची ही स्पर्धा आहे. २० डिसेंबरला आश्रमाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन उत्सवानिमित्ताने अभिषेक, श्रीगुरू सप्तशती पाठवाचन, सकाळी ११ वाजता ह.भ.प. भालचंद्र हळबे यांचे कीर्तन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी सहा वाजता आरती, नामजप, भजन आदी धार्मिक कार्यक्रम होतील.

२१ डिसेंबरला श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी चार वाजता भजन, सात वाजता साईश प्रभुदेसाई आणि सहकार्‍यांचे भक्तिगीत गायन होईल. श्री दत्तजयंतीच्या मुख्य दिवशी म्हणजेच २२ डिसेंबरला दुपारी एक वाजता सांताक्रूझ-मुंबईचे दिगंबर सुद्रिक बुवा यांचे भजन, सायंकाळी चार वाजता ह.भ.प. गणेश जोशी यांचे कीर्तन, सहा वाजता दत्तजन्मसोहळा, महाप्रसाद होईल. रात्री दिंडी सोहळ्याने उत्सवाची सांगता होईल.

गगनगिरी महाराज आश्रमातर्फे आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search