Next
लगाव बत्ती
BOI
Monday, December 31, 2018 | 10:15 AM
15 0 0
Share this article:

चालू घडामोडींवर तिरकस लिखाणासाठी शिरीष कणेकर यांचे नाव सर्वांना परिचित आहे. एखादी चांगली घटना, व्यक्ती यांचे कौतुकही हे त्यांच्या पद्धतीने करीत असतात. याचा अनुभव ‘लगाव बत्ती’मधून येते. नवीन वर्षाचे संकल्प हा आता चेष्टेचा विषय झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू यांचे काल्पनिक संकल्प यात दिले आहेत.

विनोद हा सर्वांनाचा आवडतो; पण एखाद्या विनोदात हसविण्याची कितीही ताकद असली, तरी तो कसा सांगितला जातो यावर हसणे किंवा विनोद सांगणाऱ्याला टाळणे हे अवलंबून असते, यावर विनोदी अंगाने भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे कॉलर आयडी लावण्यापूर्वी सातत्याने येणाऱ्या राँग नंबरची गंमत, सतत वाकून पाया पडणाऱ्याबद्दल लता मंगेशकर यांची आठवण, स्वतःची असमंजस वर्तणूक गुंतवणूक कंपन्यांची लबाडी, ‘ममी का मॅजिक चलेगा’सारख्या जाहिरातमधून दिसणारी ममी प्रत्यक्षात कशी दिसत नाही याचे कोडे, हॉलीवूडमध्ये मोडीत निघालेली लग्नसंस्था अशा विविध विषयांवरील खुसखुशीत भाष्य, टीका-टिपण्णी यात केली आहे.  
 
पुस्तक : लगाव बत्ती
लेखक : शिरीष कणेकर
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन
पाने : ३६४
किंमत : ३८० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search