Next
‘आसूस’तर्फे ‘विवोबुक एस१४’ सादर
प्रेस रिलीज
Friday, February 23 | 01:38 PM
15 0 0
Share this story

मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आसूसने भारतीय ग्राहकांसाठी नॅनोएज प्रकारातील डिस्प्लेने सज्ज असणारा ‘विबोबुक एस१४’ (S410UA) हा लॅपटॉप सातव्या पिढीतील कोअर आय३, आठव्या पिढीतील ‘कोअर आय५’ आणि आठव्या पिढीतील ‘कोअर आय७’ या तीन प्रकारांत उपलब्ध करून दिला आहे.

डिस्प्ले हा कोणत्याही लॅपटॉपमधील सर्वात महत्वाचा घटक असून, ‘विवोबुक एस१४’मधील १४ इंच आकारमानाचा डिस्प्ले फुल एचडी क्षमतेचा आहे. टचपॅडसह ब्लॅकलीट या प्रकारातील कीबोर्ड यात प्रदान करण्यात आला आहे. हा १४ इंची लॅपटॉप हलका आणि पोर्टेबल असून, याचे वजन १.४ किलोग्रॅम आहे. तिन्ही प्रकारांतील लॅपटॉपची रॅम तीन जीबी असून २५६ जीबीपर्यंत एसएसडी तर एक टेराबाईटपर्यंत एचडीडी स्टोरेजचे पर्याय देण्यात आले आहेत. यात तीन लिथियम आयन सेलयुक्त बॅटरी देण्यात आली असून, ती एकदा चार्ज केल्यानंतर आठ तासांचा बॅकअप देते; तसेच ही बॅटरी अवघ्या ४९ मिनिटांमध्ये तब्बल ६० टक्के चार्ज होते.  हा लॅपटॉप ‘गोल्ड’ आणि ‘ग्रे’ या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असून, ऑनलाईन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

‘आसूस विवोबुक एस१४’मध्ये विशेष आसूस स्प्लेंडीड आणि आसूस ट्रूटूलाईफ व्हिडिओ तंत्रज्ञान वैशिष्ट्ये आहेत. उत्कृष्ट व्हिज्युअल ऑप्टिमायझेशन तंत्रज्ञान कोणत्याही प्रकारच्या सामग्रीसाठी सर्वोत्तम प्रतिमा गुणवत्ता सुनिश्चित करते. यात चार डिस्प्ले मोड्स आहेत, जे एका क्लिकद्वारे ऍक्सेस करता येतात. सामान्य मोड दैनिक कार्यांसाठी योग्य आहे. विविड मोड फोटो आणि व्हिडिओ वितरीत करण्यासाठी कॉन्ट्रास्ट अनुकूल आहे. आय केअर मोड डोळ्याचा ताण दूर करण्यासाठी निळी प्रकाश पातळी कमी करते आणि मॅन्युअल मोड वैयक्तिकृत रंगसमा योजनेसाठी अनुमती देतो.

आसूस इंडियाचे बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अर्नोल्ड सु यांनी सांगितले की, ‘जीवनशैलीतील बदलामुळे स्टायलिश लॅपटॉपची मागणी वाढली आहे. ग्राहकांकडून दैनंदिन वापरासाठी देखील शक्तिशाली लॅपटॉपची मागणी आहे. ग्राहकांची ही गरज शक्तिशाली हार्डवेअरनेयुक्त ‘विवोबुक एस१४’द्वारे पूर्ण करण्यात आली आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link