Next
पेटीएमच्या युपीआय व्यवहारांत वाढ
प्रेस रिलीज
Monday, November 05, 2018 | 11:55 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : गेल्या सहा महिन्यांत पेटीएमवरील युपीआय व्यवहारांत ६०० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती पेटीएमची पालक कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने दिली.

युपीआय व्यवहारांत भारतात पेटीएमचे सर्वांत मोठे योगदान आहे शिवाय पी२पी आणि व्यापारी युपीआय व्यवहारांतही पेटीएम अग्रेसर ठरला आहे. या मंचावरून ऑक्टोबर २०१८मध्ये १७९ दशलक्षहून अधिक युपीआय व्यवहारांची नोंद झाली असून, या मंचावर राष्ट्रव्यापी यूपीआय वापरकर्त्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पेटीएमच्या मंचावर पेमेंट्स सुविधांची सर्वात व्यापक सूची उपलब्ध आहे. या मंचाने ग्राहकांना युपीआय, कार्ड आणि पेटीएम वॉलेटसहित आपल्या आवडीच्या भरणा माध्यमाचा वापर करून पेमेंट्स करण्यासाठी सक्षम बनविले आहे. भीम युपीआय ग्राहकांमध्ये सर्वाधिक आवडीचा पेमेंट्स पर्याय ठरत आहे. पेटीएमवर पेमेंट्ससाठी पेटीएम भीम युपीआयचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे.

ऑनलाइनव्यतिरिक्त कंपनी ऑफलाइन पेमेंट्ससाठी पेटीएम भीम युपीआय पर्यायाला सक्षम आणि प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी कार्यशील असून, कंपनीचे ९५ लाख ऑफलाइन व्यापाऱ्यांपैकी ६० लाखांहून अधिक व्यापारी विभिन्न खरेदीसाठी पेटीएम युपीआयचा स्वीकार करीत आहेत. याव्यतिरिक्त कंपनीकडे युपीआयवर करण्यात येणाऱ्या सर्व ऑफलाइन मर्चंट व्यवहारांपैकी ८० टक्क्यांहून अधिकचा वाटा आहे.  

पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक अॅबॉट म्हणाले, ‘मोबाइल रिचार्ज, वीज बिल, पाणी बिल, मेट्रो प्रवास आणि ऑफलाइन स्टोअर्सच्या विभिन्न सेवांसाठी वापरकर्त्यांद्वारे पेटीएम भीम युपीआयचा वाढलेला वापर निश्चितच उत्साहजनक आहे. याचाच मोठ्या प्रमाणावर वापर वाढविण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search