Next
पं. स्वपन चौधरी यांना उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर पुरस्कार
येत्या रविवारी संगीत विरासत कार्यक्रमात पुरस्कार वितरण
BOI
Tuesday, December 18, 2018 | 05:17 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘तालविश्व संस्थेतर्फे देण्यात येणारा उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर पुरस्कार यंदा प्रसिद्ध तबला वादक पं. स्वपन चौधरी यांना देण्यात येणार आहे. २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या संगीत विरासत या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे’, अशी माहिती तालविश्वचे नवाझ मिरजकर यांनी दिली.   

पं. स्वपन चौधरी
ते पुढे म्हणाले, ‘तबल्याच्या क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर यांच्या ५३ व्या, तर गुरु उस्ताद मोहम्मद हनीफ खान मिरजकर यांच्या चौथ्या स्मृतीप्रित्यर्थ तालविश्वच्या वतीने येत्या रविवारी, २३ डिसेंबर २०१८ रोजी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी साडे पाच वाजता संगीत विरासत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी पं. स्वपन चौधरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या वेळी रईस बाले खान आणि हाफिज बाले खान यांच्या सतारवादनाची अनोखी जुगलबंदी रसिकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.’ 

रईस बाले खान
‘कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालविश्व आणि टेम्पल ऑफ फाईन आर्ट्स संस्थेतील विद्यार्थी तबलावादन सादर करणार आहेत. टेम्पल ऑफ फाईन आर्ट्स संस्थेकडून सिंगापूर, मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया येथील विद्यार्थी तबलावादन सादर करतील. यानंतर पं. स्वपन चौधरी यांचे तबलावादन सादर करतील. त्यांना सारंगीवर संगीत मिश्रा साथ करणार आहेत, तर रईस बाले खान आणि हाफिज बाले खान यांच्या सतारवादनाला केतन बिडवे आणि मी स्वतः तबला साथ करणार आहे’, असेही मिरजकर यांनी सांगितले.

हाफिज बाले खान
नवाझ मिरजकर म्हणाले, ‘तालविश्वच्या वतीने उस्ताद रशीद मुस्तफा थिरकवा, तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पं. नयन घोष, उस्ताद रफ़िउद्दीन सबरी, पं. योगेश समसी अशा मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आमचे आजोबा उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर यांनी आपली तबला साधना आमचे गुरु व वडील उस्ताद मोहम्मद हनीफ खान मिरजकर यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांचीच परंपरा मी, आमचे बंधू आणि मुले चालविण्याचा प्रयत्न करत आहोत.’    

कार्यक्रमाविषयी 
संगीत विरासत
दिवस व वेळ : रविवार,२३ डिसेंबर, सायंकाळी साडे पाच वाजता.
स्थळ : आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे सभागृह.        

(नुकत्याच झालेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात प्रथमच नवाझ मिरजकर यांनी शहनाई वादक कल्याण अपार यांना तबला साथ केली. या अनुभवाविषयी त्यांनी लिहिलेला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)                        
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sanjoy Mondal About 98 Days ago
The best program. Short ND crispy bt lot to gain in small stipulated time. Packed up with lot of outcomes Bah! Bah! Bah! Kiya bat!
0
0

Select Language
Share Link