Next
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची सुरुवात
सोलापूर जिल्ह्यात झाली कार्यक्रमांची आखणी
BOI
Saturday, September 15 | 02:47 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (१५ सप्टेंबर २०१८) ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाची नवी दिल्लीत सुरुवात झाली. महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबर २०१८पर्यंत हे अभियान संपूर्ण देशभर राबविले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातही कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. 

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. १७ सप्टेंबरला प्रत्येक गावात स्वच्छता सभा होतील. हागणदारीमुक्त ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, पालक अधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. गावागांवत गृहभेटी देऊन शौचालयाचा वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले जाईल.

१७ सप्टेंबर हा सेवा दिवस म्हणून पाळण्यात येईल. या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्रमदान होणार आहे. वैयक्तिक शौचालयाच्या उभारणीसाठी खड्डे खेादणे, परिसर स्वच्छता, प्लास्टिक गोळा करणे, नादुरुस्त वैयक्तिक शौचालय दुरूस्त करून वापरायोग्य बनविणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत.

१८ सप्टेंबर रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये मैला गाळ व्यवस्थापनाअंतर्गत प्रत्येक गावातील एका कुटुबांच्या शौचालयाचा शोषखड्डा रिकामा करण्याचे प्रात्यक्षिक सर्व ग्रामस्थाना महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखविण्यात येईल. तसेच गावातील सार्वजनिक शौचालये, बसस्थानके, बाजार, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, जलस्त्रोताचा परिसर स्वच्छ केला जाईल.

ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व कार्यालये, स्वच्छतादूत, पाणी व स्वच्छणतेविषयी वक्तृत्व, निबंध स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. गावस्तरावर ग्रामसेवक, सरपंच, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, शिक्षक, आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला बचत गट, ग्राम प्रेरक यांच्या सहभागाने गृहभेटी देऊन अभियानात सक्रिय काम करणाऱ्या स्थानिक महिला भगिनींचा ग्रामपंचायतीमार्फत सन्मान केला जाईल. 

२५ सप्टेंबर रोजी सर्वत्र मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, बागा, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, गाव तलाव आदींची स्वच्छता करण्यात येईल. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदिनी स्वच्छ भारत दिवस पाळण्यात येणार आहे. त्या वेळी प्रभातफेरी, स्वच्छता रथ आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. सर्व देशभर थोड्या-फार फरकाने अशाच पद्धतीचे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link