Next
‘कोलगेट’चा ‘मेट्रो कॅश अॅंड कॅरी’बरोबर सहकार्य करार
‘पाणी वाचवा’ प्रसार मोहिमेसाठी पुढाकार
प्रेस रिलीज
Saturday, April 13, 2019 | 05:21 PM
15 0 0
Share this article:मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड आणि ‘मेट्रो कॅश अॅंड कॅरी’ यांनी सहकार्य करार करत ग्राहकांसाठी ‘पाणी बचाव’ कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण भारतातील २७ ‘मेट्रो कॅश अॅंड कॅरी’ स्टोअर्स मध्ये केले आहे. महिनाभर चालणारा हा कार्यक्रम एक एप्रिल २०१९पासून सुरू झाला असून, यामध्ये संपूर्ण भारतातील पाणी वाचवण्याच्या तसेच पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ‘कोलगेट’तर्फे ‘मेट्रो कॅश अॅंड कॅरी’च्या २७ स्टोअर्समधून खरेदी केलेल्या निवडक ‘कोलगेट’च्या पॅक्सची विक्री झाल्यावर ‘कोलगेट’तर्फे १० रुपयांचे योगदान दिले जाणार आहे. या कार्यक्रमातून  निर्माण होणारा महसूल हा त्यांचे सामाजिक कार्य सहकारी असलेली सामाजिक संस्था म्हणजेच ‘वॉटर फॉर पीपल– इंडिया ट्रस्ट’ पश्चिम बंगाल येथील बिरगाम जिल्ह्यातील लोकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दिला जाणार आहे. ही ऑफर ‘कोलगेट स्ट्राँग टी (५००ग्रॅम), कोलगेट स्वर्ण वेदशक्ती (२०० ग्रॅम), कोलगेट टोटल चारकोल (१२०+६५ ग्रॅम) आणि कोलगेट टोटल अॅडव्हान्स्ड (१२०+६५ ग्रॅम) या पॅकवर उपलब्ध असेल.

या भागीदारीविषयी बोलताना कोलगेट पामोलिव्ह (इंडिया)  लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक इस्साम बच्छानी यांनी सांगितले, ‘कोलगेट इंडियाच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणजेच पाण्याची बचत होय. पुन्हा एकदा ‘मेट्रो कॅश अॅंड कॅरी’बरोबर भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. दोघेही मिळून पाण्याच्या बचतीचा प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील असतो. आमचा असा विश्वास आहे, की पाणी वाचवण्याचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठा परिणाम दिसून येऊ शकेल.’

‘मेट्रो कॅश अॅंड कॅरी’चे एमडी आणि सीईओ अरविंद मेदीरत्ता म्हणाले, ‘‘मेट्रो’मध्ये आम्ही नेहमीच पर्यावरण संवर्धन व पाण्यासारख्या नैसर्गिक साधन संपत्तीचे दीर्घकालीन व्यवस्थापन करण्यावर जोर देत असतो. ‘कोलगेट’बरोबर पुन्हा एकदा हा करार करून पाणी वाचवण्यासाठी आमचे सहकार्य करतांना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी म्हणजे आमच्या मेट्रो वॉटर कन्झर्व्हेशन उपक्रमाचा एक भाग असून, आमच्या संपूर्ण मूल्य शृंखलेचा प्रत्येक घटक म्हणजे ग्राहक, पुरवठादार, शेतकरी, कर्मचारी पर्यावरण संवर्धनाचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करतील. एका सामूहिक लक्ष्याच्या दिशेने काम करताना आम्ही काहीतरी महत्त्वपूर्ण काम करत जागतिक स्तरावरील पाण्याची समस्या कमी करत दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर जोर देऊ शकू.’

‘कोलगेट’ आणि ‘मेट्रो कॅश अॅंड कॅरी’ने त्यांच्या ‘सेव्ह वॉटर’ कार्यक्रमाला गेल्या वर्षीही सहकार्य केले होते व यातून निर्माण होणारा महसूल त्यांनी ‘वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट’ला देण्यात आले होते व हा निधी त्यांनी महाराष्‍ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दुष्‍काळ निवारणासाठी वापरण्यात आला होता. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search