Next
ठाणे फेस्टिव्हलमध्ये रंगणार कला, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम
प्रशांत सिनकर
Tuesday, January 22, 2019 | 01:23 PM
15 0 0
Share this article:ठाणे : ‘कला, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनोखा संगम असलेला ठाणे फेस्टिव्हल २४ ते २७ जानेवारी २०१९ या कालावधीत खारीगाव येथील ९० फूट रस्त्यावर आयोजित करण्यात आला आहे. या फेस्टिवलमध्ये दररोज आर्ट कॅम्प आयोजित करण्यात आले असून, प्रथमच राजा रविवर्मा यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृती अनुभवण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे,’ अशी माहिती फेस्टिव्हलचे आयोजक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील उपस्थित होते.
 
अधिक माहिती देताना आव्हाड म्हणाले, ‘२४ जानेवारीला या फेस्टिव्हलला सुरुवात होणार असून, याचे उद्घाटन ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या उपस्थित आणि शाळकरी मुलांच्या सहभागाने केले जाणार आहे. पहिल्या दिवशी दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत दीप्ती ठाकरे यांच्या क्ले वर्कशॉप होईल. सायंकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत रवींद्र साळवे यांचे कम्पोझेशन आणि सायंकाळी सात ते रात्री १० वेळेत अशोक हांड यांचा ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.’

२५ जानेवारीला सायंकाळी चार ते सात या वेळेत अभय मोहिते यांचे फॅशन आर्ट, सायंकाळी सात ते नऊ या वेळेत विजय आचरेकर यांच लँडस्कॅप आणि सायंकाळी सात ते १० या वेळेत प्रख्यात पार्श्वगायिका मोनाली ठाकूर यांच्या संगीतमय कार्यक्रमाचा नजराणा ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. २६ जानेवारीला सायंकाळी सात ते १० वेळेत प्रशांत देसाई यांची पुतळे साकारण्याची कला (स्कल्पचर) प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. सायंकाळी सात ते नऊ या वेळेत डूडल्स केप आर्टचे सादरीकरण मनिष रांगणेकर करणार आहेत. सात वाजता सिद्धार्थ महादेवन, नऊ वाजता शिवामणी आणि १०.१५ वाजता नक्ष अझीझ हे संगीतप्रेमींना आपल्या तालावर धुंद करणार आहेत.

फेस्टिव्हल अखेरच्या दिवशी म्हणजे २७ जानेवारीला देवनागरी कॅलिग्राफी रितेश देवरुखकर हे सायंकाळी चार ते सात या वेळेत प्रमोद कुर्लेकर हे सायंकाळी सात ते नऊ या वेळेत पोट्रेट चित्रांचे प्रात्याक्षिक दाखवणार आहेत. सायंकाळी सात ते रात्री १० या वेळेत प्रख्यात गायक हरिहरन यांचा कार्यक्रम होईल. या शिवाय या फेस्टिव्हलमध्ये श्रीकांत कदम, विक्रांत भिसे, शार्दूल कदम, उत्तम साठे, मदन पवार, मनोज पातुरकर, सतीश काळे, सुरज नागवंशी, जितेंद्र गायकवाड आणि सोहम राहा या कलावंतांचे आर्ट कॅम्प चारही दिवस दिवसभर चालणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे उभारण्यात येणारे पु.ल. देशपांडे यांच्या चित्रांचे कलादालन हे या आर्ट फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण असेल. तसेच, झपूर्झा आणि पी. एन. गाडगीळ यांच्या वतीने या ठिकाणी राजा रवीवर्मा यांच्या चित्रांचे एक दालन उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी ऐतिहासिक नाणी, पुरातन शस्त्रांस्त्रांचे प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या रेखाचित्रांचेही एक दालन या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. वैभव काटवाटे या वाळू शिल्पकारातर्फे या ठिकाणी आपल्या कलेचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या ठिकाणी वैभव काटवाटे हे शिल्प तयार करणार आहेत.

देशभक्तीच्या संकल्पनेवर चित्र-शिल्पकला स्पर्धा
या फेस्टिव्हलमध्ये देशभक्तीच्या संकल्पनेवर चित्र- शिल्पकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून, प्रथम विजेत्यास ५० हजार रुपये, द्वितीय विजेत्यास ३० हजार आणि तिसरा क्रमांक पटकावणार्‍यास १५ हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क : ९०८२६ ६९१४३
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search