Next
‘ग्लोबल हॉस्पिटल’तर्फे ‘खयाल’ हा लघुपट प्रदर्शित
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य
प्रेस रिलीज
Monday, April 08, 2019 | 03:38 PM
15 0 0
Share this article:मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्याने सात एप्रिलला मुंबईतील परळ येथील ‘ग्लोबल हॉस्पिटल’ने ‘खयाल’ हा लघुपट प्रदर्शित केला. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज : एव्हरीवन, एव्हरीव्हेअर (सर्वांसाठी आरोग्य सेवा : सर्व जण, सगळीकडे) ही यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. हॉस्पिटलमध्ये देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवेवर लोकांनी विश्वास आणि भरोसा ठेवावा यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी ‘ग्लोबल हॉस्पिटल’तर्फे हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला.

हॉस्पिटलमधील पायाभूत सुविधा आणि तेथे देणाऱ्या येणाऱ्या टर्शरी केअर सेवांच्या उपलब्धतेसह गेल्या दशकात भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रात प्रचंड बदल झाले. ‘खयाल’ या लघुपटात कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकाला सर्वांगीण दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत हे अधोरेखित करण्यात आले असून, रुग्णालयांतर्फे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या टर्शरी केअर सेवांची प्रशंसा करण्यात आली आहे. हा लघुपट हॉस्पिटलमध्ये चित्रित केला आहे.परळ येथील आयआरएस- ग्लोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत शहा म्हणाले, ‘सध्याच्या काळातील वैद्यकीय समस्यांसाठी चुकीची जीवनशैली कारणीभूत असते. यांना जीवनशैलीशी निगडीत आजार म्हणतात आणि जंक फुड टाळल्यास व नियमित व्यायाम केल्यास त्याला प्रतिबंध करता येऊ शकतो. आजकाल स्थूलपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण खूप वाढले आहे. याला प्रतिबंध करता येऊ शकतो आणि नियंत्रण ठेवता येऊ शकते. ३०० हून अधिक लोक एकत्र आले आणि फळ्यावर हाताचा रंगीत ठसा उमटवून त्यांनी सुदृढ आरोग्यासाठी प्रतिज्ञा घेऊन या उपक्रमाला पाठींबा दिला.

जागतिक आरोग्य दिनाबद्दल प्रतिक्रिया देताना परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर म्हणाले, ‘भारतीय आरोग्यसेवा अर्थसाखळीमध्ये टर्शरी हॉस्पिटल्स महत्त्वाचे भागधारक आहेत आणि भारतात डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या वाढत्या घटना पाहता ‘खयाल’ या लघुपटाच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवेवर विश्वास आणि भरोसा ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा देणार आहोत. वैद्यकीय क्षेत्राकडून कोणताही भेदभाव न ठेवता अविरतपणे पुरविण्यात येणाऱ्या दर्जेदार सेवांची आपण सर्वांनी त्यांची दखल घेतली पाहिजे आणि जगभरात त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या नि:स्वार्थी सेवांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले गेले पाहिजे, असे आम्हाला वाटते.’परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमधील आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. अजित बावीस्कर म्हणाले, ‘आपत्कालीन परिस्थिती भयावह असते आणि त्या परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचविणे आणि त्याच्या-तिच्या गरजा पुरवणे हा आमचा पहिला प्रयत्न असतो. रुग्णाला प्रथमोपचार देणे, प्राथमिक तपासणी करणे आणि लवकरात लवकर उपचार करणे याकडे आमचे लक्ष असते. रुग्णाची जात, पंथ किंवा धर्म याचा भेदभाव न करता आम्ही हे करत असतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सकारात्मक परिणाम साध्य करण्यासाठी रुग्णाचा हॉस्पिटलवरील विश्वास आणि भरोसा हीच आमची ताकद असते.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search