Next
‘बँक ऑफ महाराष्ट्र’तर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन
प्रेस रिलीज
Wednesday, July 18 | 11:51 AM
15 0 0
Share this story

पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या राज्यातील पाचशेहून अधिक ग्रामीण शाखांमार्फत येत्या २८ जुलै रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात बँकेचे वरिष्ठ अधिकारी, शाखाधिकारी आणि कृषी अधिकारी शेतकरी बांधवांना पीक कर्ज आणि इतर कृषी कर्ज योजनांबाबत माहिती देतील. या वेळी शेतकऱ्यांकडून कृषीकर्ज मागणी प्रस्तावदेखील स्वीकारले जाणार आहेत. 

बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांना महाबँक किसान क्रेडिट कार्ड या योजनेद्वारे अल्प मुदत पीककर्ज उपलब्ध करते. मेळाव्यादरम्यान संबंधित शेतकऱ्यांना पीकनिहाय पतपुरवठा केला जाणार असून, त्यासोबत दहा टक्के रक्कम कापणीपश्चात खर्च आणि वीस टक्के रक्कम शेतीसामुग्री दुरूस्ती आणि देखभालीसाठी दिली जाईल. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज नूतनीकरण बाकी आहे, अशा शेतकऱ्यांना नुतनीकरणादरम्यान पीक कर्जाची दहा टक्के मर्यादा वाढवून दिली जाणार आहे. नव्या शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी प्रत्येक वर्षी दहा टक्के वाढ गृहीत धरून, पतमर्यादा मंजूर करण्यात येणार आहे. तेंव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेने केले आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link