Next
‘श्यामची आई’ स्मृती शताब्दीनिमित्त पालगडला कार्यक्रम
प्रेस रिलीज
Thursday, November 02 | 03:16 PM
15 0 0
Share this story

यशोदा साने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना वसुधा बीडकर.पालगड (दापोली) : श्यामची आई म्हणजे यशोदा सदाशिव साने यांचा स्मृती शताब्दी कार्यक्रम आज (२ नोव्हेंबर) साने गुरुजींचे जन्मस्थळ पालगड येथे त्यांचे स्मारक असलेल्या निवासस्थानी झाला.

निवृत्त मुख्याध्यापक, साने गुरुजी स्मृती समितीच्या उपाध्यक्ष आणि दापोली पेन्शनर्स असोसिएशनच्या संचालक वसुधा बीडकर यांनी यशोदा साने यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मंगेश गोंधळेकर यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

या वेळी साने गुरुजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद केळकर, खजिनदार डॉ. अशोक गोंधळेकर, वैशाली जोशी,  मुख्याध्यापक बी. डी. पाटील, मंगेश गोंधळेकर, प्राचार्य यदमलकर, विकास वाचनालयाच्या ग्रंथपाल सुलभा कदम, सौ. फडके, उद्धव सुपेकर, सौ. आठल्ये यांसह शिक्षक, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’सारखी साने गुरुजी लिखित गीते या वेळी विद्यार्थांनी म्हटली. प्रणव करमरकर या विद्यार्थाने ‘श्यामच्या आई’ची महती सांगितली. श्री. पेवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

पालगड ग्रामपंचायतीतही संतोष दळवी, विद्याधर जोशी, मालती जाधव आणि मान्यवरांच्या उपस्थितीत श्यामची आई स्मृती शताब्दी कार्यक्रम आयोजित केला होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link