Next
धानोरा येथे सेवक संमेलन
BOI
Tuesday, February 05, 2019 | 05:11 PM
15 0 0
Share this story

गडचिरोली : धानोरा येथे सात फेब्रुवारी २०१९ रोजी मानव धर्माच्या भव्य सेवक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, बेटी बचाव-बेटी पढाव, कुटुंब नियोजन आदी विविध विषयांवर जनजागृती केली जाणार आहे.
 
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गायकवाड, तहसीलदार गणविर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सात फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता शोभायात्रा, सामाजिक जागृतीपर झांकी, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तत्पूर्वी सहा फेब्रुवारीला ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सेवक बंधूंनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी नागपूर येथील परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांसह त्यांच्या कार्यकारीणी मंडळातील सर्व सदस्य उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी पाच वाजल्यापासून विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे होतील. या कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्ह्यातील आयोजक व मार्गदर्शक दिवाकर ठेंगरे यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link