Next
सलमान रश्दी
BOI
Tuesday, June 19 | 03:45 AM
15 0 0
Share this story

कादंबरीतल्या लेखनाबद्दल मुस्लिम धर्मगुरूंनी ज्यांना ठार मारण्याचा फतवा काढला होता आणि तरीही त्यांनी अज्ञातवासातून लेखन सुरू ठेवलं, अशा सलमान रश्दी यांचा १९ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
१९ जून १९४७ रोजी मुंबईत जन्मलेले आणि लंडनमध्ये स्थायिक झालेले सर अहमद सलमान रश्दी हे काही ऐतिहासिक घटनांचा तात्त्विक पद्धतीनं धांडोळा घेणारे लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये नर्म विनोद आणि मेलोड्रामाही असतो. 

त्यांची ‘ग्रिमस’ ही पहिली कादंबरी म्हणजे विज्ञानकथा होती. तिचं विशेष स्वागत झालं नाही; पण त्यांनी १९८१ साली लिहिलेली ‘मिडनाइट्स चिल्ड्रेन’ ही कादंबरी मात्र गाजली. तिचा चांगलाच खप झाला आणि समीक्षकांकडूनही कौतुक झालं. त्यापुढची ‘शेम’ ही कादंबरी पाकिस्तानातल्या कथानकावर आधारित होती. तिचंही लोकांनी स्वागत केलं; मात्र त्यापुढची ‘दी सॅटॅनिक व्हर्सेस’ ही चौथी कादंबरी कमालीच्या वादात सापडली. जगभरच्या मुस्लिमांनी त्यावर आक्षेप घेतला आणि काही गटांनी तर त्यावर बंदीची मागणीही केली. इराणच्या अयातुल्ला खोमेनी यांनी तर रश्दींना ठर मारण्याचा फतवाच काढला. जिवाला धोका असल्यामुळे रश्दींना स्कॉटलंड यार्डच्या संरक्षणात राहावं लागलं.  

...पण त्यांनी लेखन थांबवलं नव्हतं. दी ग्राउंड बिनीथ हर फीट, फ्युरी, स्टेप अक्रॉस धिस लाइन, शालिमार दी क्लाउन, दी एन्चान्ट्रेस ऑफ फ्लॉरेन्स, असं त्यांचं पुढचं लेखन प्रसिद्ध आहे. ‘मिडनाइट्स चिल्ड्रेन’ कादंबरीबद्दल त्यांना बुकर पुरस्कार मिळाला आहे. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link