Next
अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी भाजपची संस्कृती जपावी
अटलजींच्या प्रथम स्मृतिदिनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
BOI
Saturday, August 17, 2019 | 01:21 PM
15 0 0
Share this article:मुंबई :
‘सदैव देशाच्या हिताचे काम करायचे आणि पक्षाच्या वाढीचा विचार करायचा, ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती असून त्यामुळे भाजप ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे. श्रद्धेय अटलजी ही संस्कृती जगले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याप्रमाणे वागणे हीच त्यांना आदरांजली ठरेल,’ असे भावपूर्ण उद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (१६ ऑगस्ट) मुंबईत काढले.

श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भाजप प्रदेश कार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर व आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार राज पुरोहित, मराठवाडा विभागीय संघटनमंत्री भाऊराव देशमुख, दीव दमणचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी आणि प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सदैव देशहितासाठी काम करणे आणि पक्षविस्ताराचा विचार करणे यामुळेच भाजप वेगळा पक्ष आहे. हीच पक्षाची संस्कृती आहे. हा विचार अटलजी – अडवाणीजींनी आचरणात आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा हाच विचार जगत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या विचाराने आचरण करणे हीच अटलजींना योग्य आदरांजली आहे.’‘विद्वत्ता, नम्रता, प्रश्नांचा अभ्यास आणि कार्यकर्त्यांबद्दल आत्मीयता हे अटलजींचे वैशिष्ट्य होते. त्यांनी देशभर प्रवास करून कार्यकर्त्यांना प्रेरित केले. श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांनी जनसंघ, जनता पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी देशभर प्रवास केला. असंख्य अडचणींवर मात करून त्यांनी संघटन केले. भाजपचा पाया बळकट करून पक्षाला यशस्वी करण्यात अटलजी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे मोठे योगदान आहे,’ असेही पाटील म्हणाले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search