Next
‘मोटो झेड२ फोर्स’ भारतीय बाजारपेठेत दाखल
प्रेस रिलीज
Wednesday, February 21 | 06:02 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ग्राहकांचा स्मार्टफोनचा अनुभव अधिक उंचावण्याच्या दृष्टीने, मोटोरोला कंपनीने ‘मोटो झेड२ फोर्स’ या भारतातील आजवरच्या सर्वांत आधुनिक स्मार्टफोनचे भारतीय बाजारपेठेत अनावरण केले. ‘मोटो झेड२ फोर्स’ आणि ‘मोटो टर्बोपॉवर मोड’ पॅकची मर्यादित एडिशन ३४ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध होणार असून, ग्राहकांसाठी हे एडिशन १५ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट आणि भारतातील मोटो हब्समध्ये उपलब्ध होणार आहे.

स्क्रीनला तडा जाणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारच्या मोडतोडीमुळे स्मार्टफोन्सचे होणारे नुकसान नवीन ‘मोटो झेड२ फोर्स’ या स्मार्टफोनमुळे टाळता येत असून, ‘मोटो टर्बोपॉवर मोड’ या तंत्रज्ञानामुळे या डिव्हाईसला सर्वाधिक म्हणजे सहा हजार २२० एमएएचची बॅटरीची शक्ती लाभली आहे. स्लीम ऑल मेटल डिझाईन, दोन १२ एमपीचे कॅमेरे, जलद डेटा स्पीड आणि क्वालकॉमचा जलद स्नॅपड्रॅगन प्रोसेसर या माध्यमातून या डिव्हाईसने संशोधनातील कल्पकतेचा उच्चांक गाठला आहे. ग्राहकांना आपल्या आवडीचे काम स्मार्टफोनच्या मदतीने करता यावे म्हणून हे डिव्हाईस अत्यंत कमी वेळात मोटो मॉड्सवर रूपांतरित होऊ शकते. यामुळे अत्यंत अर्थपूर्ण, हेतूपुरस्सर आणि चांगल्या पद्धतीने जगाशी संपर्क साधणे सहज शक्य होते.

मोटो शॅटरशिल्डतंत्रज्ञानाच्या मदतीने आता स्क्रीन तुटण्याची अजिबात भीती वाटणार नाही. फोनची स्क्रीन तुटू नये यासाठी यातील ५.५ इंची क्वाड एचडी अमोल्डेड डिस्प्लेची हमी घेण्यात आली आहे. नवीन ‘मोटो झेड२ फोर्स’च्या स्लीम आणि पॉलिश्ड डिझाईनमुळे सात हजार सिरीज अ‍ॅल्युमिनीयमच्या ताकदीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, दररोजच्या वापरातील फोनला होणारी दुखापत यामुळे अजिबात जाणवत नाही.

स्मार्टफोनच्या बॅटरीबाबतच्या सर्व समस्यांनाही आता मोटो टर्बोपॉवर पॅकमुळे चोख उत्तर मिळाले असून, बॅटरी टिकण्याला प्राधान्य देत दररोज बॅटरीलाईफ वाढवण्यात यामुळे यश आले आहे. वापरकर्त्यांना गरजेच्या वेळी, प्रवासातही आपला फोन अत्यंत वेगाने (१५ वॅटपर्यंत) चार्ज करता येणार आहे. जर पॉवरपॅक क्षीण झाल्यासारखे वाटले, तर केवळ २० मिनिटांच्या कालावधीतच पुन्हा ५० टक्क्यांपर्यंत तो चार्ज करण्याची सुविधाही सहजसाध्य आहे.

सहा जीबीच्या जलद रॅमला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ मोबाईल प्लॅटफॉर्मची साथ लाभल्यामुळे तुमचा हा स्मार्टफोन अद्वितीय कामगिरी करून दाखवतो व त्याचा रिस्पॉन्स कालावधीही प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. यातील गिगाबीट एलटीईच्या सहाय्याने याचा डेटा स्पीडही वाढला असून आता तुम्हाला तुमची आवडती अ‍ॅप्स किंवा मोठ्या फाईल्स किमान वेळात डाऊनलोड करता येतील.

अल्ट्रा एचडी प्रकारातील संगीत किंवा व्हिडिओंच्या मोठ्या फाईल्सचा आनंदही ग्राहक आता सहज घेऊ शकणार आहेत. दोन कॅमेरे म्हणजे दुप्पट फोकस. व्यावसायिक छायाचित्रे काढण्यासाठी या स्मार्टफोनच्या प्रत्येकी १२ मेगापिक्सल क्षमतेच्या दोन कॅमेर्‍यांची मदत होणार आहे. यातील एक कॅमेरा मोनोक्रोम आणि एक कलर कॅमेरा आहे. उत्कृष्ट छायाचित्रे काढण्यासाठी हे दोन्ही कॅमेरे एकत्रितरित्या काम करतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link