Next
‘ऑटो एक्स्पो’मध्ये ‘होंडा’च्या नव्या मॉडेल्स
प्रेस रिलीज
Saturday, February 03 | 06:04 PM
15 0 0
Share this story

गुरुग्राम (नवी दिल्ली) : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे परिवर्तनीय स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादने २०१८मधील १४व्या ऑटो एक्स्पोमध्ये दाखवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. हे प्रदर्शन ग्रेटर नोएडा येथे (प्रेस डेज : सात व आठ फेब्रुवारी २०१८, पब्लिक डेज : नऊ ते १४ फेब्रुवारी) आयोजित केले जाणार आहे.

यावर्षी होंडा टू व्हीलर्सची भारताच्या पॅव्हेलियनची थीम ‘ट्रान्सफॉर्मिंग द वे इंडिया राइड्स अहेड’ ही आहे. १४व्या ऑटो एक्स्पोमध्ये, ‘होंडा’ सर्वोत्तम ११ नवी मॉडेल्स सादर करणार आहे. हे भारतातील सर्वात मोठे ऑटो एक्स्पो आहे.

होंडा आर्थिक वर्ष २०१७-१८साठी नव्या कोऱ्या मोटरसायकलच्या ब्रँडचे उद्घाटन करेल. यामध्ये २०१७-१८ साठी होंडा आपले आश्वासन पूर्ण करणार असून, नव्या कोऱ्या मोटरसायकलचे उद्घाटन केले जाणार आहे.

कंपनीने, सातत्यतेने वेळेपूर्वीच नावीन्यपूर्ण उत्पादने सादर केली आहेत, होंडा पॅव्हेलियनमध्येही पहिल्या प्रथम एकूण १० नव्या उत्साही अपग्रेडचे २०१८साठी सादरीकरण करण्यात येणार आहे.

‘टोक्यो मोटर शो २०१७’मधील जागतिक स्तरावरील सादरीकरणानंतर ‘होंडा’च्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक व्हेइकल (इव्ही) संकल्पना ‘द पीसीएक्स इलेक्ट्रिक स्कूटर’चे भारतात पहिल्यांदा प्रदर्शन केले जाणार आहे. ‘होंडा’ने आपल्या ग्राहकांसाठी अधिक उत्साहवर्धक उपक्रम आखले असून, यात प्रदर्शन भेटीबरोबरच बाहेरील सुरक्षा विभागांची भेट यांचा समावेश आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता अक्षय कुमार हेही होंडाच्या पॅव्हेलियनला येत्या वीकेंडला (१० व ११ फेब्रुवारी) भेट देणार आहेत. भारतात रस्ते सुरक्षा जागरुकता पसरवण्यासाठी वचनबद्ध असलेल्या होंडाने आउटडोअर अॅक्टिव्हिटी भागात विशेष समर्पित रायडिंग झोन तयार केले आहेत. होंडा रस्ते सुरक्षेचे महत्त्व सर्व प्रकारच्या वयोगटांतील लोकांना प्रशिक्षित केले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link