Next
प्रकाश नारायण संत, डॉ. सुरेश नाडकर्णी, डॉ. उषा देशमुख
BOI
Saturday, June 16 | 03:45 AM
15 0 0
Share this story

पौगंडावस्थेतल्या लंपनचं भावविश्व, त्याचं सुमीवरचं प्रेम आणि हुरहुर अतिशय संवेदनशीलपणे टिपणारे लेखक प्रकाश नारायण संत, वैद्यकीय विश्वावर लिहिणारे डॉ. सुरेश नाडकर्णी आणि संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. उषा देशमुख यांचा १६ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
....... 
प्रकाश नारायण संत
 
१६ जून १९३७ रोजी बेळगावात जन्मलेले प्रकाश नारायण संत हे अत्यंत तरल आणि मनाला भिडणारं लेखन करणारे लेखक म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांनी सत्यकथा मासिकातनं कथा लिहायला सुरुवात केली होती. ते उत्तम चित्रकारही होते.
 
त्यांच्या ‘लंपन’ या पौगंडावास्थेतल्या शाळकरी मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणाऱ्या (काहीशा आत्मचरित्रपर) कादंबऱ्या न वाचलेला रसिक मराठी वाचक दुर्मीळच! वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर या चार कादंबऱ्यांमधून लंपन आणि त्याची मैत्रीण सुमी, इतर मित्रमंडळी, लंपनच्या मनातली सुमीविषयीची हुरहुर, प्रेम हे सर्व संतांनी तपशीलवार, पण सुंदर प्रकारे रेखाटलंय आणि या चारही कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात एक वेगळंच स्थान राखून आहेत. स्वतः चित्रकार असल्याने संतांनी स्वतः रेखाटलेली चित्रं त्या कादंबऱ्यांच्या सौंदर्यात भर घालतात. ‘चांदण्यांचा रस्ता’ हा त्यांच्या दहा ललित लेखांचा संग्रह त्यांच्या तरल भावावस्था आणि सूक्ष्म अनुभूतींचा आविष्कारच जणू! 

१५ जुलै २००३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(प्रकाश नारायण संत यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

डॉ. सुरेश दत्तात्रय नाडकर्णी 

१६ जून १९३४ रोजी जन्मलेले डॉ. सुरेश दत्तात्रय नाडकर्णी हे वैद्यकविश्वावर लेखन करणारे लेखक म्हणून ओळखले जातात. ते मुंबईच्या बालसाहित्य परिषदेचे संस्थापक होते. ‘वैद्यकविश्व’ हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं.

बंडू वयात येतो, वैद्यकविश्व, मुलगी वयात येते, द्रोणाचार्य अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांना २००३ सालचा लेखनगौरव पुरस्कार मिळाला होता. 

२८ सप्टेंबर २००३ रोजी त्यांचं निधन झालं.

(डॉ. सुरेश नाडकर्णी यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

डॉ. उषा माधव देशमुख

१६ जून १९३६ रोजी अंमळनेरमध्ये (खानदेश) जन्मलेल्या डॉ. उषा माधव देशमुख या प्राचीन आणि अर्वाचीन वाङ्मय आणि संत साहित्याच्या अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी प्रामुख्याने ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून त्यावर अनेक पुस्तकं लिहिली. 

अवघी दुमदुमली पंढरी, कुसुमाग्रज साहित्यदर्शन, काव्यदिंडी, चाफा ते फुलवात, दीपमाळ, मराठी नियतकालिकांचा वाङ्मयीन अभ्यास खंड २, मराठी संशोधन विद्या, मराठी साहित्याचे आदिबंध, रामायणाचा आधुनिक साहित्यावरील प्रभाव, वाङ्मयीन व्यक्ती, साहित्यतोलन, साहित्य शोधणी, ज्ञानेश्वरी एक शोध, ज्ञानेश्वरी चिंतन, ज्ञानेश्वरी जागरण, ज्ञानेश्वरी विलासिते, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

१९८९ साली पुसदला भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. 

(डॉ. उषा देशमुख यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link