Next
पुण्यात २२ मार्चपासून रस्ट पेंटिंगचे प्रदर्शन
प्रेस रिलीज
Wednesday, March 20, 2019 | 02:58 PM
15 0 0
Share this article:

पुणे : चित्रकारितेमधील वेगळी शैली असलेल्या रस्ट पेंटिंगचे प्रदर्शन २२ ते २४ मार्च २०१९ या कालावधीत शनिवारपेठेतील सुदर्शन कलादालनात सकाळी ११ ते दुपारी दोन व सायंकाळी चार ते रात्री आठ दरम्यान भरविण्यात येणार आहे. रस्ट पेंटिंग ही शैली पुण्यातील कलाकार विक्रम मराठे यांनी विकसित केली आहे.

या विषयी माहिती देताना मराठे म्हणाले, ‘कागदावर लोखंडाचे तुकडे गंजवून केलेली चित्रे म्हणजे रस्ट पेंटिंग. अशा प्रकारची चित्रे हे कागदावरच काढली जातात. ही चित्रे काढण्यासाठी विशिष्ट पद्धतीने लोखंड गंजवून त्याचा गंज कागदावर उतरविला जातो.’

या पेंटिंगची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘आधुनिक चित्रकारिता ही आव्हानात्मक आहे. यामध्ये प्रवाहत असणारे अनेक जण आहेत; पण नेमक हेच मला नको होते. त्यामुळे पारंपरिक चित्रशैली वा चित्रकारिता शिकल्यावरही मला नवीन काही करण्याचा ध्यास लागला होता. एक दिवस आमच्या फ्रॅब्रिकेशनच्या वर्कशॉपमध्ये बसलो असताना गंज लागलेले लोखंड बघून या पासून चित्रे काढता येतात का असा विचार केला. त्यातून वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजेच १९९४ साली मी पहिले चित्र काढले. प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बर्वे यांनी मला या नव्या शैलीबद्दल प्रोत्साहन दिले. यातूनच पुढे ही चित्रशैली विकसित झाली. सध्या जगात अशा प्रकारची चित्रे काढणारा मी एकमेव कलाकार आहे.’

काळ हा या चित्रशैलीचा गाभा आहे. रस्ट पेटिंग्समध्ये  लोखंडाला जसा काळानुरूप गंज चढतो अगदी तशाच पद्धतीने गंजाचे चित्रिकरण केले जाते. गंज हा इतिहासाची साक्ष देणारा असतो आणि ही चित्रशैली त्याचेच प्रतीक आहे. त्यामुळे या शैलीला विषयाची मर्यादा नसल्याचे मराठे यांनी सांगितले. मराठे यांनी अशा प्रकारची ४०हून अधिक चित्रे काढली असून, केवळ गंजच नव्हे, तर या चित्रांमध्ये पतंगांच्या कागदांचा रंगही उतरविला असल्याचे ते म्हणाले.

प्रदर्शनाविषयी :
कालावधी :
२२ ते २४ मार्च २०१९
वेळ : सकाळी ११ ते दुपारी दोन आणि सायंकाळी चार ते रात्री आठ.
स्थळ : सुदर्शन कलादालन, शनिवारपेठ, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Atul Karmarkar About 155 Days ago
कुछ हटके...... मस्त
0
0

Select Language
Share Link
 
Search