Next
कोकण विभागीय लोकशाही दिन ११ फेब्रुवारीला
प्रेस रिलीज
Tuesday, February 05, 2019 | 05:42 PM
15 0 0
Share this story

नवी मुंबई : कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन ११ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही दिनी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी १० ते दुपारी एक या वेळेत जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, अडचणींबाबत अर्ज, निवेदने स्वीकारणार आहेत.

लोकशाही दिनाच्या बैठकीत ज्या अर्जदारांनी १५ दिवस अगोदर म्हणजेच २५ जानेवारीपर्यंत या कार्यालयाकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर केला असेल अशाच अर्जदारांचे म्हणणे या वेळी ऐकण्यात येईल. विहित मुदतीमध्ये सादर न केलेले अर्ज, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व-अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भातील केलेले अर्ज आणि तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत.

या दिवशी विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जावर प्रथम चौकशी करण्यात येणार असून, त्यानंतर लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जांवर टोकन क्रमांकानुसार आढावा घेण्यात येईल, असे कोकण विभागाचे उपायुक्तांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

लोकशाही दिनाविषयी :
दिवस :
११ फेब्रुवारी २०१९
वेळ : सकाळी १० ते दुपारी एक
स्थळ : विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल) समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई ४०० ६१४
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link