Next
खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान
प्रेस रिलीज
Tuesday, January 22, 2019 | 04:30 PM
15 0 0
Share this storyमुंबई : संसदेमधील उपस्थिती, चर्चासत्रांमधील सहभाग, उपस्थित प्रश्न आणि पटलावर मांडलेली खासगी विधेयके या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

चेन्नई येथील प्राइम पॉइंट फाउंडेशन आणि प्रिसेन्स इ- मॅगॅझीनतर्फे हा संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते चेन्नई येथील राजभवनमध्ये खासदार सुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राइम पॉइंट फाउंडेशनतर्फे २०१०पासून संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.

माजी निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती तसेच ‘प्राइम पॉइंट’चे संस्थापक चेअरमन के. श्रीनिवासन आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गेल्याच आठवड्यात खासदार सुळे यांनी लोकसभेत ‘राइट टू डिस्कनेक्ट’ हे खासगी विधेयक मांडले. या वेळी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सुळे यांच्या संसदेतील कामकाजाचे कौतुक केले.प्राइम पॉइंट फाउंडेशनने संसदरत्न पुरस्कारासाठी खासदार सुळे यांची पुन्हा एकदा निवड केली. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘दरम्यान जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि आशीर्वादाच्या बळावर संसदेत त्यांच्यासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. हा संसदरत्न पुरस्कार माझा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे असे मी मानते. मी हा पुरस्कार जनतेलाच समर्पित करीत आहे,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link