Next
परदेशी विद्यार्थ्यांनी पुण्यात अनुभवला रमझान ईदीचा गोडवा
प्रेस रिलीज
Tuesday, June 04, 2019 | 06:25 PM
15 0 0
Share this article:


पुणे : परदेशातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज (चार जून २०१९) सकाळी एकत्रितपणे रमझान ईदीचा गोडवा अनुभवला. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली आझम कॅम्पस परिवाराने पुढाकार घेऊन बाराशे विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे, अत्तर आणि मिठाई देऊन ईद साजरी केली. 

आखाती आणि अरबी देशात चंद्रदर्शन झाल्याने तेथील रीतीप्रमाणे पुण्यातील परदेशी विद्यार्थी ईद साजरी करतात. तिकडे आज चंद्रदर्शन झाल्याने पुण्यातही परदेशी विद्यार्थ्यांनी आजच ईद साजरी केली. आझम कॅम्पसमध्ये या विद्यार्थ्यांना खास निमंत्रित करण्यात आले आणि प्रेमाने मिठाई देण्यात आली. रमजानचे महिनाभराचे उपवास सोडण्याचा सोहळा म्हणजे रमझान ईद (ईद-उल-फित्र). त्या निमित्त आज सकाळी आझम कॅम्पसमधील मशिदीत या पुणेस्थित परदेशी विद्यार्थ्यांनी एकत्रित नमाजपठण केले. एकमेकांची गळाभेट घेऊन ईदीच्या शुभेच्छा दिल्या. 


आझम कॅम्पस परिवाराच्यातर्फे या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे, अत्तर आणि मिठाई देण्यात आली. ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. इनामदार, आझम कॅम्पसचे विश्वस्त, पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते. 

‘रमझान ईद हा आनंदसोहळा असल्याने त्यात पुण्यात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही आम्ही सामावून घेतले. घरापासून दूर असल्याची भावना प्रत्येक परदेशी विद्यार्थ्यांच्या मनात असते. एकत्रित ईद साजरी केल्याने त्यांच्या आनंदात भर पडते. पुण्याची सर्वसमावेशक आणि प्रेमळ संस्कृती दूरदेशापर्यंत जाऊन पोहोचते हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे,’ असे डॉ. इनामदार यांनी या वेळी सांगितले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search