Next
बँक ऑफ महाराष्ट्रला तिमाहीत २७ कोटींचा नफा
बँक पुन्हा प्रगतीपथावर
प्रेस रिलीज
Wednesday, October 31, 2018 | 06:35 PM
15 0 0
Share this article:

पुणे : 'बँक ऑफ महाराष्ट्रने गेल्या दहा तिमाहींपासून (मार्च २०१६पासून) होणाऱ्या तोट्यावर मात करत, सप्टेंबर २०१८ अखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीअखेर २७ कोटींचा नफा मिळवला आहे', अशी माहिती कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि सरव्यवस्थापक आणि मुख्य वित्त अधिकारी व्ही. पी. श्रीवास्तव यांनी आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या दुसऱ्या तिमाही अखेरचे आर्थिक निकाल नुकतेच जाहीर केले. त्या वेळी  दिली. 

ए. सी. राऊत
या वेळी बोलताना ए. सी. राऊत म्हणाले, ‘बँकेने आर्थिक वर्ष २०१८-१९च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कामगिरीत लक्षणीय सुधारणा केली असून, बँकेने नफा नोंदवला आहे. भागधारकांना चांगला परतावा मिळण्यासाठी आणि सातत्यपूर्ण वृद्धीसाठी बँक निरंतर प्रयत्न करत आहे.कार्यक्षमतेमध्ये सुधार, किरकोळ (रिटेल) कर्जामध्ये वृद्धी, तसेच ग्राहक आणि भागधारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढण्यावर बँकेने आपले लक्ष केंद्रीत केले आहे.’

बँकेने या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये २७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेला २३.२४ कोटीचा तोटा झाला होता. कर भरणा पश्चात गेल्या दहा तिमाहींपासून (मार्च 2016 पासून) होणाऱ्या तोट्यावर या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये बँकेने मात करून निव्वळ नफा नोंदवला आहे. कार्यान्वयन नफ्यामधील वाढ १५ टक्के असून, आर्थिक वर्ष २०१८ मधील दुसऱ्या तिमाहीमध्ये हा नफा ६९२ कोटी होता आणि आता या तिमाहीमध्ये तो ७९४ कोटी झालेला आहे. कार्यान्वयन नफ्यामधील वाढ ही मुख्यत: निव्वळ व्याजावरील उत्पन्नामध्ये वाढ, बुडीत कर्जामधील वसूली आणि कार्यान्वयीन खर्चांमध्ये केलेल्या कपातीमुळे झालेली आहे. आर्थिक वर्ष २०१९ मधील दुसऱ्या  तिमाहीमध्ये कार्यान्वयीन खर्चामध्ये चार टक्के घट झाली आहे. गतवर्षीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कार्यान्वयीन खर्च ६४० कोटी होता. तो या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ६१३कोटी झाला आहे.

व्याजेतर उत्पन्नामध्ये दहा टक्के वाढ झालेली आहे. गतवर्षीच्या दुसऱ्या  तिमाहीमध्ये व्याजेतर उत्पन्न ३६९ कोटी इतके होते, तर या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ते ४०५ कोटी झाले आहे. निव्वळ व्याज उत्पन्न या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये एक हजार तीन कोटी झाले. गतवर्षी व्याजावरील निव्वळ उत्पन्न ९६३ कोटी होते. ही वाढ चार टक्के आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या दुसऱ्या तिमाहीच्या १,९७२ कोटींच्या व्याजावरील खर्चाच्या तुलनेत ९.४६ टक्क्यांची सुधारणा होऊन तो आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी हा खर्च रुपये१,७८५ कोटी राहिला. कासा प्रकारामध्ये (बचत आणि चालू खात्यांमधील ठेवी) वाढ याबरोबरच अधिक मुल्याने आणलेल्या कर्जाची परतफेड यामुळे व्याजावरील खर्च कमी झालेला आहे. 
   
मागील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीस ठेवींवरील मूल्यदर ५.४४ टक्क्यांच्या तुलनेत या आर्थिक वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीस ५.०३ टक्के झाला आहे.
जुन्या बुडीत कर्ज खात्यामधील वसूलीही जोमदार झाली असून त्यात ८८२ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीस १३.४७ कोटी रुपयांची वसूली झाली होती, ती या वर्षीच्या तिमाहीस १३२.३३ कोटी झाली आहे.

बँकेचा एकूण व्यवसाय दोन लाख २६ हजार ६९ कोटी रुपये इतका झाला आहे. एकूण कर्जे ९० हजार ५४२ कोटींची असून, रिटेल कर्जे (किरकोळ कर्जे) व्यवसायात १५ टक्के वाढ झाली आहे. बँकेच्या एकूण ठेवी ३० सप्टेंबर २०१७ रोजी एक लाख ३५ हजार ९७ कोटी होत्या. त्या आता एक लाख ३५ हजार ५२७ कोटी झाल्या आहेत. कासा ठेवींचे प्रमाण वाढून ४६.२५ टक्के झाले आहे.निव्वळ थकीत कर्जामध्ये वीस टक्क्यांनी घट होऊन, ही कर्जे दिनांक आठ हजार ७४३ कोटी रुपये झाली आहेत. थकीत कर्जामधील रोख वसूली वर्ष १८-१९ मधील सहामाहीत ५२ टक्क्यांनी वाढून रुपये एक हजार ६३०कोटी झाली आहे.   

आता यापुढील काळात कृषी कर्जे, किरकोळ कर्जे आणि लघु तसेच माध्यम उद्योगांच्या कर्जांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासह वसुलीसाठी अथक प्रयत्न करणे आणि खासकरून बुडीत कर्जांच्या वसुलीवर लक्ष देणे. गैर व्याजेतर उत्पन्नाच्या वृद्धीवर लक्ष केंद्रीत करणे आणि कार्यान्वयीन खर्चावर अंकुश ठेवणे;तसेच नफा वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याची योजना बँकेने आखली आहे.   
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search