Next
महिंद्रा ब्लेझोच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवा
प्रेस रिलीज
Tuesday, March 13 | 11:28 AM
15 0 0
Share this story


मुंबई : महिंद्रा समुहाचा भाग असलेल्या ‘महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजन’ने (एमटीबीडी) ट्रक मालकांसाठी या क्षेत्रातील पहिल्यावहिल्या सेवा दाखल केल्याची घोषणा नऊ मार्च रोजी केली. कंपनीने ट्रकच्या मालकीसाठी ट्रकिंग उद्योगातील सर्वात कमी खर्च येईल, असे आश्वासन देऊन या बाबतीत नवा मैलाचा दगड निर्माण केला आहे.
 
महिंद्रा ब्लेझोमध्ये ऑइल बदलण्याच्या कालावधीदरम्यानचा अवधी वाढवल्याने वार्षिक सरासरी नऊ टक्क्यांचा फायदा वाहतूकदारांना होणार असून, हे सर्वोत्तम वैशिष्ट्य आहे. महिंद्रा ट्रक्सने वंगण तेलाचे दर सर्वात कमी ठेवले आहेत व त्यामुळे सर्व वाहतूकदारांना वार्षिक १८ टक्के बचतीचा लाभ मिळणार आहे. महिंद्रा ब्लेझोसाठी सहा वर्षे प्रत्येकी सहा लाख किमीची वॉरंटी देण्यात आली आहे. महिंद्रा ब्लेझोच्या या सर्व वैशिष्ट्यांमुळे भारतीय ट्रकिंग उद्योगात नवा मापदंड निर्माण केला जाणार आहे व वाहनाबद्दल सहा वर्षे मनःशांती मिळणार आहे. ट्रकच्या मालकीबाबतच्या खर्चामध्ये वाहतूक व्यवसाय चालवण्याचा खर्चही समाविष्ट आहे. या लाभांमुळे महिंद्रा ब्लेझो हा ग्राहकांना त्यांनी दिलेल्या पैशाचा मोबदला देणारा व ट्रकिंग उद्योगातील त्यांचा आवडीचा ब्रँड ठरणार आहे.
 
विनोद सहायया नव्या सेवांबद्दल महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद सहाय म्हणाले, ‘महिंद्रा ट्रक अँड बसने ग्राहक-केंद्रितता व उत्पादनात सातत्याने नावीन्य हे आमच्या उद्योगाचे मूलभूत तत्त्व राखले आहे. आज, ग्राहकांसाठी विविध प्रकारचे लाभ जाहीर करत असताना, ट्रकची मालकी व कार्य यासाठी येणारा खर्च आम्ही मोठ्या प्रमाणात कमी केला आहे व त्यामुळे हा ट्रक अधिकाधिक परवडणारा ठरेल, याची काळजी घेतली आहे. वाहतूकदारांना यामुळे महिंद्रा ब्लेझो ट्रकसाठीच्या सर्व्हिसिंग खर्चामध्ये, दरवर्षी वीस टक्क्यांपर्यंत घट करता येणार असल्याने त्यांची बचत होणार आहे; शिवाय त्यांना ट्रकच्या मालकीचा विनासायास अनुभव मिळणार आहे. या उद्योगातील पहिल्यावहिल्या व बदल आणू शकणाऱ्या लाभांची दखल वाहतूकदार घेतील व पैशाचे उत्तम मूल्य मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या पसंतीचा ब्रँड म्हणून महिंद्रा ब्लेझोची निवड करतील, असा विश्वास आहे.” 
 
 
महिंद्रा ट्रक अँड बसविषयी :
महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजन सर्व एकात्मिक ट्रकिंग सेवा पुरवते. कंपनीने विशिष्ट प्रकारच्या वापरासाठी खास पद्धतीचे ट्रक तयार करून व व्यवसायाच्या गरजेनुसार अप्रतिम कामगिरी करून, आपले स्थान उंचावले आहे. उत्तम कामगिरी करणारी वाहने, विक्रीनंतर तत्पर सेवा, विस्तारित वॉरंटी व अन्य अनेक फायदे यामुळे महिंद्राने भारतीय ट्रकिंग उद्योगात नवा मैलाचा दगड निर्माण केला आहे.
 
महिंद्राची एचसीव्ही उत्पादने भारतीय ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन तयार करण्यात आली आहेत व त्यामध्ये ‘मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया’ या विचाराचा अवलंब केला आहे. एचसीव्ही श्रेणीमध्ये, महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनचे ४० हजारांहून अधिक एचसीव्ही ट्रक रस्त्यावर धावत आहेत. अवजड व्यावसायिक वाहनांच्या ब्लेझो रेंजचे उत्पादन चाकणमधील ‘ग्रीन फिल्ड’ प्रकल्पामध्ये केले जाते. अंदाजे सातशे एकरांमध्ये विस्तारलेला हा प्रकल्प चार हजार कोटी रुपये गुंतवणूक करून उभारला आहे व इथे महिंद्राच्या अन्य उत्पादनांचीही निर्मिती होते. यामुळे महिंद्रा समुहाला एकात्मिक उत्पादन सुविधेच्या समन्वयाचा लाभ घेणे शक्य होते. 

एलसीव्ही श्रेणीमध्ये, महिंद्रा ट्रक अँड बस डिव्हिजनची अंदाजे एक लाख ८५ हजार वाहने अगोदरच भारतीय रस्त्यांवर धावत आहेत. ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या जहीराबाद येथील प्रकल्पात एलसीव्ही लोड व्हेइकल व बस यांची निर्मिती केली जाते.

कंपनीची ‘नाऊ’ ही भारतातील पहिली बहुभाषीय, अखंड सेवा देणारी हेल्पलाइन असून, ग्राहकांना व चालकांना तातडीने पाठिंबा उपलब्ध करण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञ तिच्याशी जोडलेले आहेत. नाऊ मोबाइल सर्व्हिस व्हॅन व मोबाइल वर्कशॉप यामुळे सपोर्ट नेटवर्कची व्याप्ती व तत्परता वाढली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link