Next
‘अवेकनिंग सोल’ने जिंकली मने
BOI
Monday, November 13 | 11:23 AM
15 0 0
Share this story

‘अवेकनिंग सोल’मधील एक प्रसंगपुण्यात सुरू असलेल्या ‘आयपार इंटरनॅशनल फेस्टिव्हल’ची शेवटची संध्याकाळ (१२ नोव्हेंबर) रंगली ती दीक्षा अॅकॅडमीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कथ्थक आणि सु बिट्र बन्ना, बा बिट्रे सुन्ना या नाटकांनी. दीक्षा अॅकॅडमीच्या अनुजा क्षीरसागर, अबोली धायरकर, अनया पाळंदे, आदिती रिचवडकर व सृष्टी मराठे यांनी ‘अवेकनिंग सोल’ (Awakening Soul)  हे सादरीकरण केले. 

‘भला हुआ मेरी मटकी’ या कबीराच्या एका दोह्यावर त्यांनी सादरीकरण केले. त्यात ‌माणसाच्या आयुष्याची तुलना मातीच्या मडक्यासोबत करण्यात आली होती. माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांचे अतिशय सुंदर पद्धतीने चित्रण यात करण्यात आले होते. अत्यंत उत्तम मुद्रा आणि सर्वांचाच चांगला अभिनय यामुळे ‌या सादरीकरणाने एक वेगळी उंची‌ गाठली आणि सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. अॅकॅडमीच्या गुरुवर्या आभा वांभुरकर यांनी सादरीकरणाचे दिग्दर्शन केले होते. ‘प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स’मध्ये परशुराम महंत यांनी सादर केलेल्या भजनालाही सर्वांची दाद मिळाली. 

‘आयपार’चे प्रसाद वनारसे यांनी सर्वांचे आभार मानले.

- आकाश गुळाणकर
ई-मेल : akash.gulankar@gmail.com

(‘आयपार महोत्सवा’चे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील वार्तांकन वाचण्यासाठी https://goo.gl/12cDAa येथे क्लिक करा.) 

(‘अवेकनिंग सोल’ची झलक दर्शविणारा व्हिडिओ)


(परशुराम महंत यांनी सादर केलेल्या भजनाची झलक दर्शविणारा व्हिडिओ)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
Most Popular
Most Commented

Select Language
Share Link