Next
सिद्धगडावर जागवल्या गेल्या क्रांतीच्या स्मृती
दत्तात्रय पाटील
Wednesday, January 02, 2019 | 02:05 PM
15 0 0
Share this story

मुरबाड : ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात सिद्धगडाच्या घनदाट जंगलात आझाद दस्त्याचे संस्थापक वीर भाई कोतवाल व वीर हिराजी पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी दर वर्षी दोन जानेवारी रोजी रात्रभर सिद्धगड स्मारक समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा ७६व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेले आझाद दस्त्याचे संस्थापक वीर भाई कोतवाल व त्यांचे सहकारी वीर हिराजी पाटील यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. दोन जानेवारी १९४३ रोजी ब्रिटिश पोलीस अधीक्षक हॉल याने मुरबाड तालुक्यात सिद्धगडाच्या घनदाट जंगलात सकाळी सहा वाजून १० मिनिटांनी केलेल्या गोळीबारात भाई कोतवाल व हिराजी पाटील हुतात्मा झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुरबाडच्या सिद्धगड स्मारक समितीतर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या देशभक्तांच्या कार्यावर, तसेच सिद्धगडाच्या रणसंग्रामावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, समूहगीत स्पर्धा, पोवाडे असे कार्यक्रम शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले.


हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांचे वंशज, तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील, स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार, आमदार किसन कथोरे, माजी आमदार दिगंबर विशे, ‘सिडको’चे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, तसेच ठाणे व रायगड जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर वर्षीप्रमाणे विविध ठिकाणचे तरुण-तरुणी या वेळी क्रांती ज्योती घेऊन आले होते. शिवळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावून या कार्यक्रमाच्या आयोजन समितीला सहकार्य केले.

(कार्यक्रमाची झलक पाहा, तसेच या घटनेचा इतिहास जाणून घ्या सोबतच्या व्हिडिओतून...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suraj shelar About 75 Days ago
Jay hind
0
0

Select Language
Share Link