Next
‘होंडा’चे पश्चिम भागात एक कोटीपेक्षा अधिक ग्राहक
केवळ तीन वर्षांत जोडले ५० लाख ग्राहक
प्रेस रिलीज
Wednesday, August 22, 2018 | 03:33 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘होंडा’ टू व्हीलर ब्रँडने (एचएमएसआय) २००१मध्ये स्थापना झाल्यापासून, पश्चिम भारतात (गुजरात, गोवा व महाराष्ट्र) एकूण एक कोटी युनिटच्या विक्रीचा लक्षणीय टप्पा ओलांडल्याचे जाहीर केले आहे.

यादविंदर सिंग गुलेरिया
पहिल्या ५० लाख ग्राहकांना सेवा देण्यासाठी ब्रँडला १४ वर्षे लागली, परंतु नंतरचे ५० लाख ग्राहक केवळ तीन वर्षांत जोडण्यात आले. ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानत आणि या लक्षणीय यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘पश्चिम भागातील एक कोटी ग्राहकांचे होंडा परिवारामध्ये स्वागत आहे आणि त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी होंडावर विश्वास दर्शवल्याबद्दल त्यांचे आभार. ग्राहकांना आमची उत्पादने व सेवा याद्वारे आनंद देण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. होंडामुळे आमच्या ग्राहकांचा प्रवास सुखाचा होवो, ही सदिच्छा.’

‘पश्चिम भागामध्ये होंडा निर्विवादपणे पहिल्या क्रमांकावर असून, टू व्हीलर क्षेत्रामध्ये तिचा बाजारहिस्सा ४७ टक्के  आहे. यामुळे स्कूटरायझेशनला चालना मिळाली असून, ४५ टक्के ग्राहकांनी स्कूटर खरेदी केली आहे. या तुलनेत संपूर्ण भारतातील सरासरी ३२ टक्के आहे. पश्चिम भागातील जवळजवळ प्रत्येक दुसरा ग्राहक केवळ होंडा टू व्हीलर खरेदी करतो. होंडाने २०१६ मध्ये आपला चौथा व केवळ स्कूटरसाठीचा जगातील सर्वात मोठा प्रकल्प गुजरातमधील विठलापूर येथे स्थापन केला. वार्षिक उत्पादन क्षमता १.२ दशलक्ष युनिट असलेल्या होंडाने गुजरातमध्ये अंदाजे १५ हजार नवे रोजगार निर्माण केले आहेत’, असेही गुलेरिया यांनी सांगितले. 

‘रस्ता सुरक्षेला चालना देण्यासाठी, होंडाने नाशिकमधील येवले येथे ट्रॅफिक पार्क साकारले आहे. सर्व वयोगटांतील अंदाजे दोन लाख जणांना सुरक्षितपणे गाडी चालवण्याविषयी शिक्षित केले आहे, या उपक्रमामध्ये महिला व बालकांवर विशेष भर देण्यात आला आहे’, अशी माहितीही गुलेरिया यांनी दिली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search