Next
‘कॉर्पोरेट कार्निव्हल’ स्पर्धेत ‘अॅसेंचर’चे वर्चस्व
प्रेस रिलीज
Tuesday, April 17 | 04:12 PM
15 0 0
Share this story

पुणे : कॉर्पोरेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खिलाडूवृत्तीचा कस लागणाऱ्या ‘कॉर्पोरेट कार्निव्हल’ या स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये ‘अॅसेंचर’ने पुरूष आणि महिला दुहेरीबरोबरच मिश्र दुहेरीत बाजी मारत तीन सुवर्णपदकांची कमाई केली. याशिवाय महिला एकेरी व मिश्र दुहेरीत दोन रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावून ‘असेंचर’ने एकूण सहा पदकांवर आपले नाव कोरले. बॅडमिंटनमध्ये ‘सी क्वीन शिपिंग’ आणि ‘कॅपजेमिनी’ने प्रत्येकी चार पदके पटकावत स्पर्धेत आपले वर्चस्व निर्माण केले.

‘फेअर सेन्स स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ आणि ‘ट्विडल डिझायनोग्राफी’ यांच्यातर्फे तिसऱ्या ‘कॉर्पोरेट कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल १०० कंपन्या या उपक्रमात सहभागी झाल्या असून २२ एप्रिलपर्यंत दर शनिवारी व रविवारी चोंधे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये विविध क्रिडास्पर्धा रंगणार आहेत.

टेबल टेनिसच्या पुरूष एकेरी स्पर्धेत ‘कस्टम्स अँड सेंट्रल एक्साईज’च्या वैभव दहिभाते यांनी ‘बीएनवाय मेलन’च्या अर्पित गुप्ता यांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. महिला एकेरीत ‘त्रिविक्रम उद्योग प्रा. लिमिटेड’च्या पूर्वा सोहोनी यांनी ‘अॅसेंचर’च्या रेवती देशपांडे यांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. पुरूष दुहेरीत ‘अॅसेंचर’च्या जय कोठारी आणि विवेक कश्यप यांनी ‘बीएनवाय मेलन’च्या अर्पित गुप्ता आणि अर्पित श्रीवास्तव यांना हरवून सुवर्णपदक पटकावले. महिला दुहेरीत ‘अॅसेंचर’च्या दिव्या सिंग आणि सपना यांनी ‘दासॉल्ट सिस्टीम्स’च्या पूनम चव्हाण आणि नेहा यांना नमवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत देखील ‘अॅसेंचर’च्या विवेक कश्यप आणि सपना यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाची चुणूक दाखवत सुवर्णपदक जिंकले. त्यांनी ‘अॅसेंचर’च्याच जय कोठारी आणि दिव्या सिंग यांचा पराभव केला.

टेबल टेनिस स्पर्धेत ‘बीएनवाय मेलन’च्या अर्पित श्रीवास्तव यांनी पुरूष एकेरीत, ‘अॅसेंचर’च्या सपना यांनी महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले. ‘दासॉल्ट सिस्टीम्स’च्या शैलेश देशपांडे आणि अभिषेक परमार यांना पुरूष दुहेरीत,‘ऑलस्टेट सोल्युशन्स’च्या हेमांगी आणि एलिझा यांना महिला दुहेरीत, तर ‘दासॉल्ट सिस्टीम्स’च्या शैलेश देशपांडे आणि पूनम यांना मिश्र दुहेरीत कांस्य मिळाले.

बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरी प्रकारात ‘कॅपजेमिनी’च्या आशिष पंडित यांनी ‘अनु टेक्नोलॉजी’च्या सुशांत पाटील यांचा पराभव केला. महिला एकेरीत ‘केपीआयटी’च्या संध्या यांनी आपल्या सहकारी प्राजक्ता जोशी यांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. 

या स्पर्धेच्या पुरूष दुहेरीत ‘कॅपजेमिनी’च्या आशिष पंडित आणि दुर्वेश चटोपाध्याय यांनी तर, महिला दुहेरीत ‘सी क्विन शिपिंग’च्या वर्षा परदेशी आणि अंजली लोटके यांच्या जोडीने सुवर्णपदक मिळवले. त्यांच्याकडून पराभूत झालेल्या अनुक्रमे ‘सी क्विन शिपिंग’च्या कौशिक धर आणि सतीश मुनिअप्पा आणि‘केपीआयटी’च्या प्राजक्ता आणि सपना यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. याबरोबरच ‘सी क्वीन शिपिंग’च्या कौशिक धर आणि अंजली लोटके यांनी आपले सहकारी सतीश मुनीअप्पा आणि वर्षा परदेशी यांचा पराभव करीत मिश्र दुहेरीत बाजी मारली.

बॅडमिंटन स्पर्धेत ‘कॅपजेमिनी’च्या दुर्वेश चटोपाध्याय यांनी पुरूष एकेरीत तर ‘डाटामेटिक’च्या मानसी कांबळे यांनी महिला एकेरीत कांस्य पदक जिंकले. पुरूष दुहेरीत ‘दासॉल्ट सिस्टिम्स’चे आकाश भालेकर आणि शिवाशीष, तर महिला दुहेरीत बीएनवाय मेलनच्या शिल्पा निलेश आणि नेहा गोयल या कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या. ‘कॅपजेमिनी’च्या दुर्वेश आणि स्मिता यांनी मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावले.

कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुरूष एकेरी प्रकारात ‘एशियन पेंट्स’च्या प्रियांग वैद्य यांनी ‘इमर्सन’च्या ज्ञानेश्वर चंदन यांच्यावर २५-० अशी मात करीत सुवर्णपदक पटकावले, तर ‘एल अँड टी इन्फोटेक’च्या तेजस तुळसकर यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला एकेरीत ‘ऑलस्टेट सोल्युशन्स’च्या स्नेहा रणगरी यांनी ‘एडियंट इंडिया’च्या पुजा मालगावकर यांना १०-५ अशा गुणांनी पराभूत करीत सुवर्णपदक मिळवले, तर ‘बीएनवाय मेलन’च्या स्वाती वर्मा यांनी कांस्यपदक जिंकले.

कॅरम स्पर्धेच्या पुरूष दुहेरीत ‘महिंद्रा व्हेइकल्स’च्या कुणाल सहारे आणि रोहित रासकर यांनी २५-१० गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ‘सुझलॉन’च्या उदय सहस्रबुद्धे आणि कृष्णकांत श्रीवास्तव यांनी रौप्यपदक, तर ‘एडियंट इंडिया’च्या अभिजित घवाटे आणि शशिकांत यांनी कांस्यपदक मिळवले. महिला दुहेरीत ‘कॉग्निझंट’च्या स्नेहल आणि सत्तरूपा शोम या ११-५ गुणांसह ‘बीएनवाय मेलन’च्या स्वाती आणि जान्हवी यांचा पराभव करून सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. ‘दासॉल्ट सिस्टीम्सच्या पूनम चव्हाण आणि नेहा खेळकर यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link