Next
जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचा कार्यक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, January 03 | 02:48 PM
15 0 0
Share this story


पुणे : नव्या वर्षात ‘ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन’ (जीजेएफ)तर्फे बहुप्रतिक्षित व्यावसायिक नेटवर्किंगच्या कार्यक्रमाचा ‘प्रीफर्ड मॅन्युफॅक्चरर ऑफ इंडिया’(पीएमआय)चा अधिक मोठा आणि अधिक चांगला अवतार सादर करण्यात येत आहे. हा कार्यक्रम पुण्याच्या जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये आठ ते दहा जानेवारी २०१७ या कालावधीत होईल. जीजेएफच्या लोकप्रिय बी2बी मार्केटिंगच्या व्यासपीठावरून प्रामुख्याने भारतातील विशेष दागिन्यांच्या व्यापाराचे दर्शन घडते आणि जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रातील चर्चा होते.
 
२०११मध्ये स्थापना झाल्यापासून पीएमआय उपक्रमाला मोठा पाठिंबा लाभला आहे आणि उद्योगक्षेत्रातील सहभागींकडून सकारात्मक पाठिंबाही प्राप्त होत आहे. भारतभरातील व्यापाऱ्यांसाठी विविध संधी उपलब्ध होत असल्याने, हा प्रतिसाद मोठा आहे.

जीजेएफचे अध्यक्ष नीतिन खंडेलवाल म्हणाले, ‘पीएमआय ही स्टेलर खरेदीदार विक्रीकारांची बैठक आहे आणि सर्व प्रकारच्या सोनारांसाठीचे वार्षिक वितरणाचे कँलेंडर घेऊन येणारा उपक्रम आहे. पीएमआय प्रोग्रॅम निवडक शहरे आणि नगरांमधून निवडण्यात येतात. यात उत्पादक, घाऊक व्यापारी आणि रिटेलर्स आदी मागणी व पुरवठ्याच्या गरजांनुसार निवडले जातात. खास करून व्यवसाय वाढावा आणि आरामदायी अनुभव मिळावा, यासाठी पीएमआय शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात येते.’

जीजेएफचे संचालक आणि पीएमआयचे संयोजक सुमीत आनंद म्हणाले, ‘२०१८ या वर्षाच्या सुरुवातीस प्रीफेर्ड मॅन्युफॅक्चरर ऑफ इंडिया (पीएमआय) या एका महाविशेष कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. पीएमआयचा हा भाग आधीच्या भागांपेक्षा अधिक वेगळा असणार आहे. प्रत्येक पीएमआयमध्ये आमच्यासाठी नव्या, अधिक चांगल्या खरेदीदार विक्रेत्यांच्या बैठकांतून काहीतरी शिकण्यासारखे असते. पुण्याची बाजारपेठ आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि जीजेएफ उपक्रमाला या स्मार्ट सिटीत नेहमीच भरघोस यश प्राप्त झालेले आहे. या वर्षीचे प्रमुख सहभागीदार पीएमआयच्या टीमकडून निवडण्यात आले आहेत आणि ते आपापल्या उत्पादनांमधील अग्रेसर आहेत. त्यांच्या उपक्रमातील सहभागामुळे पहिल्या दिवसापासूनच मोठे यश प्राप्त होणार आहे.’

जीजेएफचे संचालक आणि पीएमआयचे सह-संयोजक नीतिन कदम म्हणाले, ‘पीएमआयच्या चौथ्या भागात अधिक मोठ्या, अधिक चांगल्या आणि व्यवसायप्रवण घटकांचा समावेश असणार आहे. उपक्रमाचे ठिकाण ते उत्तम सहभागीदार आणि कार्यक्रम व त्याहीपलिकडे सर्व घटक दर्जेदार असणार आहेत. पीएमआयच्या अनोख्या व्यासपीठावर सहभागी झालेले सर्वजण हे अपडेटेड आणि बदलत्या बाजारपेठांच्या परिस्थितीतही संबंधित राहिलेले आहेत. त्यांचा ग्राहकाधार व व्यवसाय त्यांनी वाढवलेला आहे, उत्पादनातील नावीन्यपूर्णतेचा प्रसार करतानाच ही वाढ त्यांनी केली आहे.
उत्पादनांचे दर आणि श्रेणी यांच्या धर्तीवर रिटेलर्सनी स्पर्धात्मकतेत मदत केली आहे, तसेच ब्रँड आणि स्टोअर्स यांच्या विशेष अंतर राखताना सेवांचा पाठिंबा दिला आहे.’

जीजेएफच्या पीएमआय व्यासपीठावरून स्पर्धात्मक नफा देताना त्यात वाढ करण्यावर लक्ष पुरवणे, वेळेची बचत करणे तसेच मार्केटिंग आणि प्रसारात्मक दरांमध्ये घट करणे आदी गोष्टीही केल्या जातात. याशिवाय पीएमआय हा सोने, हिरे आणि जडाऊ प्रकारावर परिणाम करणाऱ्या काही कमी कार्यक्रमांपैकी एक आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link