Next
‘सीएम चषक’स्पर्धेसाठी आतापर्यंत तब्बल ३३ लाख लोकांची नोंदणी
BOI
Tuesday, December 11 | 03:50 PM
15 0 0
Share this story


मुंबई : ‘सीएम चषक’ला महाराष्ट्र प्रदेशस्तरावरून जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत एकूण ३२ लाख ६१ हजार ७४६ लोकांनी ‘सीएम चषक’च्या विविध स्पर्धामध्ये आपली नोंदणी केली आहे. मुंबई शहरातून सुमारे साडेपाच लाखांहूनही जास्त लोक ‘सीएम चषक’ मधल्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहेत. 

संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेत सहभागी होण्यात युवतींचा कल जास्त असल्याचे दिसून येत आहे. फक्त रांगोळी, कविता, नृत्य, पेंटिंग यासारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी एकूण चार  लाख ७६ हजार ८७२ युवतींनी नोंदणी केली आहे. 

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर आणि युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ‘सीएम चषक’मध्ये सहभागी झाल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत. ‘सीएम चषक’मध्ये सहभागी होण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सुरू आहे. युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन नोंदणी करत आहेत, तर युवती आणि ग्रामीण भागांमधे ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून नोंदणीप्रक्रिया चालू आहे. महाराष्ट्र स्तरावर आयोजित केल्या जात असलेल्या या क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेकडे पाहता ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे.

प्रदेश स्तरावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचासुद्धा याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने होत असलेली ही विशाल आणि व्यापक स्पर्धा महाराष्ट्रभरातल्या लोकांना एकमेकांशी जोडण्यात आणि खेळाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल असा सूर युवावर्गातून उमटत आहे. प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात ‘सीएम चषक’ स्पर्धा सुरू झाली असून, लोक हिरीरीने सहभाग घेत आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link