Next
‘आयरोबोट’तर्फे भारतात ‘रूम्बा ६०६’ सादर
प्रेस रिलीज
Wednesday, March 28, 2018 | 01:45 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आयरोबोटने रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर ‘रूम्बा ६०६’ भारतीय बाजारात सादर केले आहे. आधुनिक कलात्मकतेचा स्पर्श असलेले ‘रूम्बा ६०६’ हे उपकरण तबकडीच्या आकाराचे काळ्या रंगात उपलब्ध आहे. याच्या अनोख्या डिझाइनमुळे ते बहुतांशी सर्व फर्निचरच्या खाली जाऊन तसेच पोहोचण्यास अवघड अशा जागी जाऊन सफाई करू शकते.

क्लीन बटण दाबले की ‘रूम्बा ६०६’ आपले काम सुरू करतो. त्यासाठी इतर कोणताही प्रोग्राम सेट करण्याची गरज नाही. ‘रूम्बा ६०६’ आयरोबोट स्टोअर आणि अमेझॉन इंडियावर १९ हजार ९९० या सवलतीच्या किंमतीत उपलब्ध आहे.

यामध्ये तीनस्तरीय सफाई प्रणाली आहे. ज्यात दोन मल्टी-सरफेस ब्रश आहेत व एक विशेष डिझाइनचा एज-स्वीपिंग ब्रश आहे. यातील दुहेरी ब्रशमुळे एजिटेशन, ब्रशिंग, सक्शन होते व अगदी लहान कणांपासून मोठा कचरा फरशीवरून साफ होतो. यातील एज-स्वीपिंग ब्रश २७ अंश कोनात बसवलेला आहे, ज्यामुळे तो ‘रूम्बा’च्या मार्गात येणाऱ्या भिंतींच्या काना-कोपऱ्यात जाऊन कचरा आणि धूळ साफ करू शकतो व त्याच्या मागोमाग तेथे व्हॅक्यूमने सफाई होते.

हा रोबो आपल्या डर्ट डिटेक्ट टेक्नॉलॉजीच्या मदतीने धूळ जमा होत असेल अशा अधिक वर्दळ असलेल्या जागा हुडकून काढून त्यावर लक्ष केंद्रित करतो. यातील प्रगत सेन्सर्समुळे ‘रूम्बा ६०६’ घरात हुशारीने हालचाल करतो. यातील आयअॅडॅप्ट (iAdapt) नेव्हीगेशन तंत्रज्ञान या उपकरणाला प्रती सेकंद ६० पेक्षा अधिक निर्णय घेण्यास सक्षम बनवते, ज्यामुळे ते तुमच्या घराच्या आतील भागाचा अंदाज घेते आणि फरशी आणि गालिचे व्यवस्थित साफ करते.

यात बसवलेल्या क्लिफ डिटेक्शन सेन्सर्समुळे हा रोबो पायऱ्यांवरून किंवा इतर उंचवट्यांवरून खाली पडत नाही. सफाईचे काम पूर्ण झाल्यावर किंवा बॅटरी कमी झाल्यास तो स्वतःहून आपल्या होम बेस चार्जिंग स्टेशनवर रिचार्जिंगसाठी येतो. जेव्हा हे उपकरण जमिनीवरून गालिचावर जाते व पुन्हा खाली उतरते, त्यावेळी ‘रूम्बा’चे क्लीनिंग हेड आपली ऊंची समायोजित करू शकते. यामुळे दुहेरी मल्टी-सरफेस ब्रश विविध सपाटींच्या निकट संपर्कात राहतात आणि लाकूड, टाइल्स, दगड, लॅमिनेटसारखे कठीण पृष्ठभाग व गालिचा प्रभावीरित्या साफ होतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link