Next
गांधी जयंतीनिमित्त शांती मार्चचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, October 02, 2018 | 04:44 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त शांती मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे सलग नवव्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. शांती मार्च हा त्यातील एक भाग होता. गांधी जयंती म्हणजेच दोन ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे शांती मार्चचे आयोजन सकाळी केले होते. अलका चौक, सेनापती बापट पुतळा ते लोकमान्य टिळक पुतळा महात्मा फुले मंडई असा याचा मार्ग होता. मंडई येथे समारोप झाला.

शांती मार्चच्या प्रारंभी लोकशाही उत्सव समितीने ‘आजची लोकशाही’ विषयावर मिलिंद चव्हाण आणि सहकाऱ्यांनी पथनाट्य सादर केले. या मार्चमध्ये रेव्हरंड चित्रलेखा जेम्स, झाएदभाई हे धर्मगुरू यांच्यासह सर्वोदय मंडळाचे जयवंत मठकर, नानासाहेब जाधव, हरीश बुटले, युक्रांदचे सचिव संदीप बर्वे, युक्रांदच्या शहराध्यक्ष मयुरी शिंदे, आप्पा अनारसे, विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

‘चालूया दंगलमुक्त समाजासाठी... ’ हे आवाहन करण्यासाठी दरवर्षी दोन ऑक्टोबरला हा शांती मार्च काढला जातो.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search