Next
हिरो मोटोकॉर्पची रोडस्टर- द एक्स्ट्रीम टू हंड्रेड आर
प्रेस रिलीज
Wednesday, January 31 | 02:00 PM
15 0 0
Share this story

मुंबई : उच्च इंजिन क्षमता वर्गातील आपल्या सुधारित उत्पादनांवरील भर कायम ठेवताना, ‘हिरो मोटोकॉर्प लिमिटेड’ या जगातील सर्वांत मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीने ‘एक्स्ट्रीम टू हंड्रेड आर’ ही नवी गाडी सादर केली आहे. हिरोचे अस्तित्व वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम मोटरसायकल वर्गातील एक्स्ट्रीम टू हंड्रेड आर देशातील सर्व हिरो मोटोकॉर्प डीलर्सकडे एप्रिल २०१८पासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. त्यासाठी लवकरच ग्राहक बुकिंग सुरू होणार आहे.

प्रीमियम वर्गात आघाडीवर असलेली एक्स्ट्रीम टू हंड्रेड आर अभूतपूर्व अशी कामगिरी आणि प्रीमियम वैशिष्ट्ये देते आणि त्यातून देशातील वाढत्या प्रीमियम मोटरसायकल वर्गवारीच्या रचनेला नव्याने आकार देते.

एक्स्ट्रीम टू हंड्रेडआर तिची ताकद आणि आक्रमक स्टायलिंग यांच्याद्वारे एक रोडस्टर स्टान्स देते. त्यात बीएस- फोर पूर्तता केलेले दोनशे सीसी एअर कूल्ड इंजिन असून, त्यासोबत उत्तम तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम रायडिंग रचना आहे. ही हिरो मोटोकॉर्पच्या जयपूरमधील ‘सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉल़ॉजी’मध्ये त्यांच्या स्वतःच्या आरअँडडी टीमकडून डिझाइन आणि तयार करण्यात आली आहे.

हिरो मोटोकॉर्पचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मार्कस ब्राऊनस्पेर्गर म्हणाले, ‘एक्स्ट्रीम टू हंड्रेड आर ही आमच्या अंतर्गत उत्पादन विकास क्षमतांचे प्रतिबिंब असून, त्यातून हिरो सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (सीआयटी) मध्ये असलेले संशोधन आणि विकास प्रयत्नही दिसून येतात. नवीन एक्स्ट्रीम टू हंड्रेड आर कामगिरी, अद्ययावत तंत्रज्ञान आणि तगडे रूप यांचा एक सुंदर संगम आहे. पुढील वर्षभर आम्ही नवीन उत्पादने आणणार आहोत.’

हिरो मोटोकॉर्प हा प्रवासी वर्गातील बाजारातील आघाडीचा ब्रँड कायम राहिला असून, तो आता उच्च क्षमतेच्या मोटरसायकल्ससोबत प्रीमियम वर्गावर लक्ष केंद्रित करत आहे.
 
हिरो मोटोकॉर्पच्या जागतिक उत्पादन प्लॅनिंगचे प्रमुख मालो ल मेसन म्हणाले की, ‘नवीन एक्स्ट्रीम टू हंड्रेडआर हे प्रीमियम वर्गात आपले अस्तित्व नव्याने आकाराला आणण्याच्या दिशेने टाकलेले एक धाडसी आणि अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. एक्स्ट्रीम टू हंड्रेडआर ही गाडी खऱ्या अर्थाने देखणी आहे आणि स्पर्धात्मक कामगिरीमुळे ती भारतातील तसेच, जगभरातील तरुणांच्या पसंतीला उतरेल. ही फक्त एक सुरुवात आहे. २०१८पासून हिरो मोटोकॉर्पचे मोटरसायकल्सच्या क्षेत्रातील प्रमुख काम हे प्रीमियम वर्गात असेल आणि आम्ही या वर्गात नवनवीन उत्पादने नक्कीच आणू.’ 

हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाळ म्हणाले, ‘मी कायमच तंत्रज्ञानाच्या क्रांतीकारी शक्तीवर विश्वास ठेवला आहे आणि माझा विश्वास आहे की, भविष्यातील मोबिलिटी उपाययोजना तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेने प्रेरित असतील. हीच भूमिका कायम ठेवताना आमच्या हिरो सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (सीआयटी) मधील अभियंत्यांनी सातत्याने आमच्या जगभरातील ग्राहकांसाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचा विकास करण्यात पुढाकार घेतला आहे. नवीन एक्स्ट्रीम टू हंड्रेडआर ही या प्रयत्नांचा परिपाक आहे. आम्ही या वर्षाची सुरुवात एका सकारात्मक दृष्टिकोनातून केली आहे आणि पुढे जात असताना, आम्ही आमच्या ग्राहकांना नवनवीन उत्पादनांद्वारे आकर्षित करू. त्यातील काही उत्पादने फेब्रुवारीमध्ये आयोजित होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात येतील.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link