Next
अनमोल सणांच्या गोष्टी
BOI
Tuesday, April 10, 2018 | 10:51 AM
15 0 0
Share this story

आपले सण व उत्सव हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. आपली संस्कृती टिकून राहण्यास आणि पुढे नेण्यास ते उपयुक्त ठरतात; तसेच सद्गुणांची परंपरा कायम राखतात. त्यामुळे नव्या पिढ्यांना सणांचे महत्त्व समजायला हवे. त्या दृष्टीने श्रीकांत गोवंडे यांनी या पुस्तकात आपल्या सण-उत्सवांची माहिती दिली आहे.

गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला सण. पाठोपाठ रामनवमी, परशुराम जयंती, अक्षय्य तृतीय येतात. या सणांच्या माहितीबरोबर श्रावण महिन्यांतील सण, भाद्रपदातील गौरी-गणपती येतात. या सणांचे सांस्कृतिक महत्त्व पुस्तकातून समजते. दिवाळी, मकरसंक्रांत, होळी येते. पोंगल, ओणमसारख्या परप्रांतीय आणि ईद, नाताळ, नवरोज अशा अन्य धर्मातील सणांचीही ओळख होते. त्याचबरोबर स्वातंत्र दिन, प्रजाक्सताक दिन, गुरुनानक जयंती अशा उत्सवांची माहितीही पूरक चित्रांसह समजते.

प्रकाशक : अनमोल प्रकाशन
पाने : १५२
किंमत : ११० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link