Next
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन उत्साहात
मिलिंद जाधव
Friday, June 14, 2019 | 01:42 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे १४वे राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव येथील कांताई सभागृहात उत्साहात झाले.

या राज्यस्तरीय अधिवेशनास खासदार रक्षा खडसे, राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील, जळगावच्या महापौर सीमा घोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजाजी माने, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंढे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी, राज्यातील सर्व प्रमुख जिल्ह्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन सत्रांत झालेल्या या अधिवेशनात प्रथम सत्रात प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष राजाजी माने यांनी केले. सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

या सत्रात ‘लोकमत’चे प्रतिनिधी मिलिंद कुलकर्णी यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपाबाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंढे अधिस्वीकृतीसंदर्भात मार्गदर्शन करतांना पत्रकारांच्या अनेक समस्यांचे शंका निरसन केले.

दुसऱ्या सत्राचे प्रास्ताविक करताना राज्य संघटक संजय भोकरे यांनी पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेतला. वसंतराव मुंढे यांनी पत्रकारांच्या विविध मागण्या खासदार रक्षा खडसे व राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर मांडल्या. 

या वेळी रक्षा खडसे व गुलाबराव पाटील यांनी आपण पत्रकारांच्या मागण्या शासन दरबारी मांडू व पत्रकारांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

या वेळी राज्यस्तरावर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य कार्यकारिणीतर्फे ठाणे जिल्ह्याला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. जिल्हा कार्यकारिणी, तालुका अध्यक्ष व  सदस्यांना सोबत घेऊन अनेक उपक्रम राबवून समाजोपयोगी कार्य करून घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांचा खासदार खडसे, राज्य सहकार मंत्री पाटील, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष मुंढे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे व पत्रकार संघाच्या मान्यवरांच्या हस्ते पुणेरी पगडी, मानाची शाल, पुष्पगुच्छ व स्मतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या अधिवेशनासाठी ठाणे जिल्ह्यातून अध्यक्ष भगवान चंदे, कार्याध्यक्ष संतोष गायकर, उपाध्यक्ष नरेश पाटील, किशोर शेलवले, शंकर करडे व सदस्यांमध्ये संजय भोईर, किशोर पाटील, संजय भालेराव, सुरजपाल यादव, जनार्दन मोगरे, सुनील घरत, अरुण ठाकरे, दीपक हिरे, राकेश शिवदे, सुनील देवरे, प्रशांत गडगे, विकास उंबरगोडे, लखीचंद पाटील यांचा समावेश होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search